Marathi Ukhane for Female Old :- स्त्रियांनी घ्यायचे उखाणे या post वरती क्लिक करून आपण Ukhane Marathi या सुप्रसिद्ध वेबसाइट वरती आल्याबद्धल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण नेहमी आपल्या आसपास पाहतो कि स्त्रियांना बऱ्याच वेगवेगळ्या प्रसंगी उखाण्यांची गरज असते. बऱ्याच स्त्रियांना उखाण्याविषयी जास्त माहिती नसते. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत स्त्रियांनी घ्यायचे उखाणे (Marathi Ukhane for Female Old). या पोस्टमध्ये आपल्याला विविध प्रकारचे उखाणे वाचायला मिळतील.
आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो कि, Marathi Ukhane for Female Old ( स्त्रियांनी घ्यायचे उखाणे ) ही पोस्ट वाचल्यानंतर आपण योग्य ठिकाणी उखाणा घेऊन आपल्या जिवलग व्यक्तीला Special Feel देऊ शकता.
स्त्रियांनी घ्यायचे उखाणे💘
महादेवाच्या मंदिरात हळदी कुंकवाच्या राशी,
………….. चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर माहेरचा संगम होतो छान,
………….रावांनी दिला मला सौभाग्याचा मान.
सनई चौघडा वाजे सुरात,
…………. रावांच नाव घेते आनंदाच्या भरात.
कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती,
…………. राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती.
कुणाचा करू नये मत्सर कुणाचा करू नये ठेवा,
…………. रावांच नाव घेते नीट लक्षात ठेवा.
विघ्नहर्त्या विनायका, एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण करते तुला,
सर्वजण सुखी राहो, हा आशीर्वाद दे मला.
साखरपुड्याला हिऱ्याची अंगठी,
…………… रावांचं जीवन माझ्यासाठी..
पुरणपोळीवर साजूक तुपाची धार,
…………… रावांनी आणला मला मोत्याचा हार
मोत्यांच्या नथीला चांदीची डबी,
…………… रावांच्या मनात नेहमी माझीच छवी
लग्नानंतरचा पहिला सण दिवाळसण
…………… रावांनी घेतले मला सोन्याचे पैंजण.
माझ्या पायात चांदीची जोडवी,
…………… रावांनी सकाळी भूपाळी गावी.
मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,
…………… रावांचे नाव घेऊन करने इच्छापूर्ती.
छुम छुम वाजतात पायातले चाळ,
…………… रावांनी आणली मला मोहनमाळ.
सावरीच्या कापसाची मऊ-मऊ उशी,
…………… रावांनी घातली मला सोन्याची ठुशी.
ऋख्वतावर दिली मोत्याची सुपारी,
…………… रावांबरोबर माझं लग्न लागलं दुपारी.
घरासमोरील अंगणात मोगऱ्याची कळी,
…………… रावांबरोबर लग्न लागलं सकाळी.
मांडवात लग्न लागलं संध्याकाळच्या वेळी,
…………… रावांच्या नावानं कुंकू लावलं भाळी.
घरामध्ये आणले सिओरचे गहू,
…………… चं रूप मी किती वेळा पाहू.
लग्नात केला बासमती तांदळाचा मसालेभात,
…………… रावांच्या हातात …………… ने दिला हात.
लग्नात लावतात हळद आणि कुंकू,
…………… राव आणि मी साऱ्यांची मने जिंकू.
हळदीच्या दिवशी गातात गोड-गोड गाणी,
…………… ची मी तर सुगंधी रातराणी.
झोक्यावर बसले की झोका मागे पुढे हाले,
…………… बरोबर मन आनंदाने डोले.
Marathi Ukhane for Female
पतिव्रत्याचे व्रत घेऊन नम्रतेने वागते,
…………. रावांना आयुष्य ईश्वराला मागते.
लावीत होते कुंकू त्यात पडला मोती,
…………. रावांसारखे गुणी पती मिळाले देवाचे आभार मानू किती.
सावित्रीच्या पती प्रेमापुढे यमदूत हारला,
………….रावांच्या नावाने सौभाग्याचा चुडा भरला.
कळी उमलते आहे,फूल बनू पाहते आहे,
…………. रावांच्या संसारात गंध सुगंध अनुभवते आहे.
शिवाजी महाराजांची जगभर आहे किर्ती,
………….रावांची माझ्यावर अखंड राहो प्रीती.
सासरी आनंद ,माहेरी आनंद ,आनंदाला नाही तोटा,
…………. राव हेच माझा दागिना मोठा.
शुभमंगल प्रसंगी जन्मल्या सुना लेकी,
…………. रावांच्या घराण्याची अशीच राहावी ऐकी.
सरस्वतीची करते पुजा ,लक्ष्मीला देते मान,
…………. रावांच नाव घेऊन मागते चुडेदान.
जास्वंदीच्या फुलांचा हार,गणपती बाप्पाच्या गळ्यात,
……….रावांचे नाव घेते ,स्त्रियांच्या मेळयात.
संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली,
………. रावांच्या संसारात मे आहे भाग्यशाली.
Modern Marathi Ukhane for Female
हिवाळ्यात लागते थंडी ,उन्हाळ्यात लागते ऊन,
……….रावांच नाव घेते ………. ची सून.
नाव घ्या ,नाव घ्या ,आग्रह असतो सर्वांचा,
……….रावांचे नाव असते ओठांवर पण प्रश्न असतो उखाण्याचा.
ऋख्वतात दिला रूप्याचा घडा,
…………… रावांकडून घेतला झाडं जगवण्याचा धडा.
हिरव्या चाफ्याचं फुलं असत हिरवं,
…………… चं नाव घेते, मला नाही गर्व.
गुलाबाच फुल सुंदर गुलाबी ताज,
…………… चं नाव घेते हेच सौभाग्य माझं.
मला काही येत नाही मी आहे साधी,
…………… रावांच नाव घेते सर्वांच्या आधी.
बागेत दरवळतं सुगंधी फूल,
…………… नी पांघरली स्वाभिमानाची झुल.
लग्नात केला केशरी भात,
…………… ने दिला …………… च्या हाती हात.
मांगल्याच्या तेजाने अजळतो देव्हारा देवाचा,
…………… रावांच्या संसारात फुलो फुलोरा सौख्याचा.
घरासमोर वाहतो झुळ झुळ झरा,
…………… शी विवाह केला आनंद झालाय खरा
लता मंगेशकर गाते गोड गळ्याने गाणं,
…………… ने घातलं मला सौभाग्याच लेणं.
अंगणात बहरल्या जाई-जुई,
…………… रावांशिवाय मला करमत नाही.
श्रीकृष्ण वाजवतो मंजुळ बासरी,
…………… बरोबर लग्न करून आले मी सासरी.
संक्रांतीच्या सणाची साडी आणली काळी,
…………… चं नाव घेतांना खुलते माझी कळी.
संक्रांतीचा तीळगूळ लागतो गोड,
…………… च्या संसाराला …………… ची जोड.
सासरची माणसं प्रेमळ आहेत सर्व,
…………… रावांना कसलाही नाही गर्व.
लग्नानंतर सोडलं माझं गांव,
…………… च्या नावापुढे लावलं माझं नाव.
हिरवीगार तुळस असते पवित्र,
…………… च्या नावाने बांधलं गळ्यात मंगळसूत्र.
Marathi Ukhane for Female
पेरुच्या झाडावर पोपट बसले पंगतीला ,
……….रावांचे नाव घेते ,सुवासिनीच्या संगतीला.
आजघर मजघर,मजघरात होती गाडी,
गादीवर होती उशी,उशीवर होती बशी,
………. राव बसले मित्रांपाशी,त्यांना हाक मारू कशी.
रायगडावर केले मी,शिवरायांचे दर्शन,
……….रावांच्या प्रेमासाठी संपूर्ण जीवन अर्पण.
आदघर मदघर ,मदघरात होती चूल,
चुलीवर होता तवा,त्यावर भाजला रवा,
………. रावांसोबत थाटला संसार नवा.
वय झाले लग्नाचे ,लागली प्रेमाची चाहूल ,
……….रावांच्या जीवनात टाकते मी पाऊल.
वडयात वडा ,बटाटा वडा,
………. रावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
शब्द सुमने गुंफून तयार होते काव्यमाला,
………. रावांचे नाव घेते ………. ची बाला
गरम गरम भाजीबरोबर नरम नरम पाव,
……….राव आहेत बरे ,पण खातात खूपच भाव.
अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य,
……….रावांचा आनंद हेच माझे सौख्य.
अभिमान नसावा स्वरूपाचा ,गर्व नसावा पैशाचा ,
……….रावांचा शब्द नेहमीच असतो सुखाचा.
बसायला दिला चंदनाचा पाट,
…………… रावांशी बांधली माझी गाठ.
खंडेरायाच्या यात्रेला जायचा केला मी बेत,
…………… रावांचं धान्यान भरलं सारं शेत.
शेतात नांगर धरून दमले कारभारी,
…………… च्या घरची सारी उचलली मी जबाबदारी.
Traditional Ukhane in Marathi for Female
दिवस आले सुगीचे, धनी माझे आनंदात,
…………… रावांना मी सदा सुखी करीन संसारात.
शेतात आहे खळं, खळ्यात आहे मका,
…………… चं नाव घेते सर्वांनी ऐका.
अवेळी पडला पाऊस की, होते जिवाची तगमग,
…………… बरोबर कष्ट करून, जिंकेन सारं जग.
विठ्ठलाचे हे वारकरी, यांचा गोड गळा,
…………… बरोबर कष्टाने पिकवू द्राक्षाचा मळा.
दहा एकर वावर आमचा, धनी माझे शेतकरी,
…………… सह कष्ट करून, खाऊ कष्टाची भाकरी.
ढवळ्या-पवळ्या बैल जोडी, त्यांच्यावरच भिस्त सगळी,
म्हणूनच …………… राव पोळ्याच्या दिवशी खाऊ घालतात त्यांना पुरणपोळी.
सासू-सासरे-दीर- र- जावा आम्ही सारे एकत्र,
…………… रावांच्या हातात आहेत साऱ्या घराची सूत्र.
देवापुढील निरांजनात लावल्या अखंड ज्योती,
…………… रावांची आहे मोठ्ठी गुलाबाची शेती.
ह्यांच्या शेतात पिकते सोन्यासारखी ज्वारी,
…………… ची माणसं प्रेमळ आहेत सारी.
चैन केली, जोडवी केली, हौस राहिली गोफाची,
…………… सह काळजी घेईन, माझ्या सासू-सासऱ्यांची.
भल्या पहाटे डोंगराआडून, सूर्यदेव डोकावतो,
…………… राव आणि मी त्याला पहिला नमस्कार करतो.
Marathi Ukhane for Female Romantic👩❤️👨
सात जन्माची पुण्याई फळाला आली आज,
………….. च्या हाताने मंगळसूत्राचा ल्याले साज.
चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,
………….. च्या जीवनात टाकले आज पाऊल.
निळ्या नभावर कर्तृत्वाचा असे रुपेरी ठसा,
………….. सह करीत आहे संसाराचा श्रीगणेशा.
भ्रमराच्या गुंजरवे मुग्ध झाली कमलिनी,
…………..ची पत्नी झाले आजच्या शुभदिनी.
चंद्राच्या उदयाने प्रफुल्लित होते कुमुदिनी,
…………..ची पत्नी झाले आजच्या शुभदिनी.
चंद्राच्या मागे चांदींनीची चाहूल,
………….. च्या जीवनात टाकते आज पाऊल.
वर्षा ऋतूमध्ये धरित्री होते हिरवीगार,
…………. रावांनी घातला मला सौभाग्याचा हार.
पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा,
…………. रावांच्या जीवावर भरते सौभाग्याचा चुडा.
राम ,लक्ष्मण,भरत,शत्रूध्न दशरथाला पुत्र चार,
…………. रावांनी घातला मला सौभाग्याचा हार.
अंबरठ्याचे माप ओलांडून, …………. च्या घरची झाले सून,
…………. ची गृहलक्ष्मी झाले भाग्य कोणते याहून.
गणपतीपुढे केली फुलांची आरास,
…………… च्या सुखाचा मला आहे ध्यास.
Funny Ukhane in Marathi for Female
वटपौर्णिमेला करतात वडाच्या झाडाची पूजा,
…………… सदा सुखी राहो, हेच मनी माझ्या.
नागपंचमीच्या सणाला झाडाला बांधला झोका,
…………… रावांच नाव घेते साऱ्यांनी ऐका.
नागपंचमीला नागचं चित्र पाटावर काढावं,
दिवसेंदिवस माझ्या मनात …………… चं प्रेम वाढावं.
घरधन्याच्या शेताला पाटाचं पाणी,
…………… सहवासात सुचतात गाणी.
ढवळ्या-पवळ्या बैलांची घुंगरांची गाडी,
…………… रावांनी घेतली मला जरतारी साडी.
हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात,
…………… च्या बरोबर लग्न करून आले …………… च्या घरात.
…………… ची आहे सोयाबिनची शेती,
…………… बरोबर जपीन सासरची नाती.
वसंताच्या आगमनाला कोकीळेची साद,
…………… च्या संसारात यावा सौख्याचा नाद
गाईच्या शेणानं सारवल्या भिंती,
…………… सह जोडली सारी प्रेमळ नाती.
शेती मालाला जेव्हा चांगला भाव मिळेल,
…………… नां आणि मला तेव्हा शांतता लाभेल.
…………… राव चालवतात प्रौढ शिक्षण वर्ग,
तेव्हा आनंदाने उरतो मला दोन बोट स्वर्ग.
कृषी महाविद्यालयात हे आधुनिक शेती शिकवतात,
…………… रावांच्या विषयी मनात आनंदाचे मळे फुलतात.
पुढील पिढीला शेती करता यावी निट म्हणून,
…………… रावांच्या प्रयत्नाने झाले येथे कृषिविद्यापीठ.
शेतात पिकणाऱ्या ऊसापासून बनवतो आम्ही गूळ,
…………… रावांच घर म्हणजे जणू कृष्णाचं गोकूळ.
गारपीटीने झालं बागायतीचं नुकसान फार,
तेव्हा …………… रावांसह झालो आम्ही एकमेकांचे आधार.
Marathi Ukhane for Female
सासरवाशी मुलीने नम्रतेने वागावे,
…………. रावांना आयुष्य मोरेश्वराला मागावे.
चांदीच्या ताटात खडीसाखरेचे खडे,
…………. रावांचे नाव घेते विठ्ठल रुक्मिणी पुढे.
चौकटीला लक्ष्मी सरस्वती मधे गणपती,
………….रावांची मी राहो अखंड सौभाग्यवती.
आकाशात चमकतो तारा,अंगठीत चमकतो खडा,
…………. रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चूडा.
गंगा नदीला आला होता पुर,
…………. रावांसाठी माहेर केले दूर.
करंडाच्या कळसावर आहे माझा मोर,
………….रावांसाठी गंगेकाठी आले भाग्य माझे थोर.
देवाला काही मागण्यापेक्षा सौभाग्य मागावे,
………….रावांच्या संसारात लींनतेने वागावे.
जीवान आहे क्षणभंगुर ,नाही त्याचा भरवसा,
………….रावांच्या संसारात लीन राहण्याचा घेतला मी वसा.
आत्महत्या करू नये म्हणून शेती मालाला मिळावा हमीभाव,
…………… रावांसह रोज हेच म्हणतय सारा गांव.
लग्न करेन तर फक्त त्यांच्याशीच अशी लावली होती बेट,
……….रावांच नाव घेते, आजही आठवते मला आमची पहिली भेट.
भरघोस पीक येण्यासाठी राबतो क्षणअन्क्षण,
…………… रावांचं एकत्र कुटुंब म्हणजे सुखी जीवनाचं लक्षण.
Romantic Ukhane in Marathi for Female
लाल लाल पागोट गुलाबी शेला,
…………… रावांना आईने दिला चांदीचा पेला.
कळीदार कपूरी विड्याचं पान,
…………… रावांबरोबर संसार करीन छान.
जेवणानंतर दिला विडा, विड्यात घातला काथ,
…………… रावांना जन्मभर करीन श्रमाने साथ.
कोजागिरीला आटीव दुधात घातलं केशर,
…………… रावांच नाव घेते, मला मनासारखं मिळालं सासर.
शेवयांची खीर करतांना खिरीत घातली साखर,
…………… रावांवर सदा असूदे आई-बाबांच्या मायेची पाखर.
सोन्यासारख्या शेतीला मिळतं पाटाच पाणी,
…………… रावांबरोबर झोक्यावर बसून गाईन सुरेल गाणी.
खंडोबाच्या जत्रेत असते शर्यत बैलांची,
…………… रावांच्या संसाराला साथ देईन प्रेमाची.
शेतात लावल्या भाज्या, खुडल्या ताज्या ताज्या,
…………… सह. संसारावर अन्नपूर्णे, कृपा कर माझ्या..
संसाराच्या सारीपाटावर पडलं योग्य दान,
…………… रावांच्या सहवासात हरपत माझ भान.
संसार करता करता मी समाजकार्यही करते,
…………… रावांसह देवीचा आशीर्वाद मागते.
पेरणी झाली, पाऊस पडला शेत हिरवीगार,
…………… रावांचा सहवास, मला आवडतो फार.
जेवण झाल्यावर विडा दिला, त्यात घातला गुलकंद,
…………… च्या सहवासात मिळतो मला आनंद.
शेती मालाला हमीभाव मिळाला, तर शेतकरी कौतुकाने सांगेल,
…………… राव म्हणतात, तो आत्महत्या न करता आनंदात नांदेल.
Marathi Ukhane for Female
सोन्याच्या ताटात चांदीची वाटी,
सात जन्म घेईन मी ……….रावांसाठी.
येत होती जात होती,घडाळ्यात पाहत होती, घडाळ्यात वाजले एक ,
……….रावांचे नाव घेते ……….ची लेक.
मिठाचा सत्याग्रह झाला समुद्रकाठी,
……….रावांच नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.
नाजुक अनारसे साजूक तुपात तळावे,
………. रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.
रक्षण मातृभूमीचे करतो ,फौजी माझा हौशी ,
……….रावांच नाव घेते २६ जानेवारीच्या दिवशी.
महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस,
……….माझे वृंदावन, मी त्यांची तुळस.
देवब्राम्हण अग्निसाक्षीने घेतले मी सात फेरे,
………. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
देवळाला खरी शोभा कळसाने येते ,
……….मुळे माझे गृहसौख्य दुणावते.
आग्रहाखातर नाव घेते ,आशीर्वाद द्यावा,
……….रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा.
बकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध,
……….रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.
दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची
……….रावांचं नाव घेते सून मी ……….यांची.
आजकाल भाज्यांना चव नाही फोडू नका खापर,
…………… राव सतत सांगतात करा नैसर्गिक खतांचा वापर.
झाडे लावा, झाडे जगवा, कोप नको निसर्गाचा,
…………… राव म्हणतात, प्रत्येकाने हाच धडा गिरवायचा.
चांगला उठाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला,
…………… राव म्हणतात, तरच आळा बसेल शेतकऱ्यांच्या आत्महत्येला.
घरामधील देवघरात गणपतीची मूर्ती,
…………… रावांच्या बोलण्याने येते साऱ्या घराला स्फुर्ती.
देवासमोर निरांजनात लावते फुलवात,
…………… रावांच्या साथीने करते संसाराला सुरुवात.
बऱ्याच दिवसांच स्वप्न झालं साकार,
…………… रावांनी केला माझा पत्नी म्हणून स्वीकार.
पिल्लांकडे लक्ष ठेवून फिरते आकाशात घार,
…………… राव माझ्या जीवनाचे साथीदार.
वृंदावनात लावली हिरवीगार तुळस,
…………… रावांच नाव घ्यायला मी कधीच करत नाही आळस.
बागेमध्ये खुलते गुलाबाची कळी,
…………… रावांच नाव घेते …………… च्या वेळी.
हसतमुख राहून नेहमी बोलावे गोड,
…………… रावांच्या संसाराला …………… ची जोड.
माझेच मला कळत नाही, हे स्वप्न की भास,
…………… रावांना देते …………… चा घास.
ह्यांचे नाव असते सदैव माझ्या ओठी,
…………… रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.
सुंदर रांगोळी काढण्यासाठी सारवले अंगण,
…………… रावांच नाव घेवून सोडते कंकण.
सनईचे मंगल सूर चौघडा लागला वाजू.
…………… रावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू.
फुलांमध्ये श्रेष्ठ फुलाच नाव आहे मदनबाण,
…………… राव आहेत माझा जीव की प्राण.
मराठीतच बोलायचं हाच मराठी बाणा,
…………… रावांचं नाव घ्यायला हवा कशाला उखाणा..
Marathi Ukhane for Female Funny🥰
संसाराच्या अंगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी,
…………..ची अर्धांगिनी / पत्नी झाले आजच्या दिवशी.
गौतमाची गौतमी, वसिष्ठांची अरुंधती,
…………..ची झाले आज सौभाग्यवती.
नेत्राच्या निरंजनात प्रीतीची करते फुलवात,
………….. च्या नावास आज केली सुरुवात.
चांदीच्या तबकात हळदी कुंकवाचा काला,
………….. च्या नावास आज प्रारंभ केला.
सासर आणि माहेर स्त्रीचे दोन नेत्र,
………….. च्या नावाने बांधले आज मणी-मंगळसूत्र.
चंद्राला पाहून हर्षित होते रोहिणी,
…………..ची झाले आज मी अर्धांगिनी.
आई माते जोगेश्वरी वंदन करते तुला,
…………. रावांच नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.
फूल कमळाचे मध्ये गणपती,
…………. मी आहे सौभाग्यवती.
आई वडिलांची सेवा करावी जीवा,
…………. रावांच नाव घेऊन पाहीन मोक्षाचा ठेवा.
सोन्याच्या अंगठीत रंगीत खडा ,
…………. रावांनी घातला मला सौभाग्याचा चुडा.
चांदीच्या सुईला सोन्याच वेज,
…………. रावांच्या चेहर्यावर सूर्याच तेज.
मारुतीच्या पायावर ओवतात मणी,
…………. राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी.
राहिले तेवढे दिवस आनंदाने जगावे ,
…………. रावांना आयुष्य ईश्वराला मागावे.
घराच्या प्रवेशद्वारावर फुलांचे वेल चढले,
…………… रावांच्या रूपाने मला प्रेमळ पती लाभले.
थंडगार पाण्याचा भरून ठेवला घडा,
…………… रावांना मी दिलेला चांगलाच रंगला विडा.
नाव घे नाव घे किती करता ठणाणा,
…………… रावांच नाव घ्यायला रचते सुंदर उखाणा.
अन्नपूर्णेची मूर्ती ठेवून पुजला गौरीहार,
…………… रावांबरोबर काम करतांना मी घेणार नाही माघार.
खण, नारळ, साखरेने भरली माझी ओटी,
…………… रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी.
केशरी भात, खीर, मोदक, जेवण पंचपक्वांनांचं,
मंगळसुत्र, हिरवा चुडा लेणं ल्यायले मी सौभाग्याचं.
केसात गजरा, पायात पैंजण, हिरवा साज मी ल्याले,
…………… ची कन्या मी. …..ची पत्नी झाले.
कृष्णाने अर्जुनाला सांगितली भग्वद्गीता,
…………… रावांची मी म्हणजे रामाची सीता.
लग्नानंतर माहेर सोडून, सासरी मी आले,
…………… ची सून …………… रावांची पत्नी झाले.
बसायला चंदनाचा पाट, तर जेवायला चांदीचे ताट,
…………… चं नाव घेते, सासूबाईंनी केला डोहाळे जेवणाचा घाट.
चैत्र गौरीच्या हळदी-कुंकवाला भरतात सुवासिनीची ओटी,
…………… रावांचे नाव असते सदैव माझ्या ओठी.
नदीला दुसरं नाव आहे सरिता,
…………… रावांचं नाव घेते खास तुमच्याकरता.
देवीची भरली ओटी, ओटीत होता हिरवा खण,
…………… रावांचं नाव घेते, आज आहे दिवळासण.
महादेवाच्या पिंडीपुढे दोन्ही हात जोडले,
…………… रावांसाठी माझे आईवडील सोडले.
आजच आले कुलस्वामिनीची ओटी भरून,
…………… रावांच्या नावाने कुंकू लावले कपाळभरून.
आकाशात ढग आले, नर्तन करतात मोर,
…………… च्या नावानं कपाळी लावली चंद्रकोर.
Marathi Ukhane for Female
पती पत्नी समजतात एकमेकांना राजा राणी,
………….रावांची आहे मधुर वाणी.
पती पत्नीची ईश्वरानी बनवलीत अतूट नाती,
………….राव आहेत माझे जीवनसाथी.
मुलगी असते परक्याची धन,
………….रावांसाठी माझे जीवन.
आयुष्यातील बरेच दिवस संपले ,थोडेच दिवस राहिले,
………….रावांच्या चरणी जीवनपुष्प वाहिले.
स्त्री म्हणजे संसारातील चालती बोलती बाहुली,
………….रावांची राहो माझ्यावर जन्मभर सावली.
केळीच्या पानावर पाय ठेऊ कशी,
लग्न नाही झाले तर नाव घेऊ कशी.
अस्सल सोने २४ कॅरेट,
……….आणि माझे झाले आज मॅरेज.
लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
……….रावांचे नाव घेऊन आयुष्याचे सुरू झाले नवे सत्र.
नव्या नव्या शालूचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते,
……….च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते.
श्रीमंतांची श्रीमंती,गरिबांचा देव वाली,
……….रावांच नाव घेऊन मी झाले सौभाग्यशाली.
वडिलांनी केले लग्न,भावांनी दिले आंदण,मामांनी केला आहेर,
……….रावांसाठी सोडले प्रेमाचे माहेर.
श्रीमंत असो वा गरीब असो स्त्रियांना आवडते माहेर ,
……….रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
आभाळ भरले चांदण्यांनी ,चंद्र मात्र एक ,
……….रावांचे नाव घेते ……….ची लेक.
द्राक्षाच्या बागेत पोपट करतो टोटो,
……….रावांच्या हातात माझाच फोटो.
आला आला उन्हाळा, संगे घामाच्या ह्या धारा,
……….रावांचे नाव घेते लावून एसी चा थंड वारा.
काही शब्द येतात ओठातुन,काही येतात गळ्यातून ,
……….चं नाव येत मात्र थेट माझ्या हृदयातून.
नव्या नवरीला शोभतो हिरव्या बांगड्यांचा चुडा,
……….आणि ………. चा आज आहे साखरपुडा .
धाण्याचे माप शिगोशिग भरले,
……….रावांची मी आज सौभाग्यवती झाले.
शिवाजीच्या बरोबर होते लढवय्ये मावळे,
…………… राव आहेत कृष्णाप्रमाणे सावळे.
हिरवागार शालू नेसले भरजरी,
मायेची पाखर घालीन …………… रावांच्या घरी.
हजारो फुलली फुले, हजारो सुहास त्यांचे,
जन्मोजन्मीचे नाते माझे अन् …………… रावांचे.
हिरवगार शेत तशीच हिरवी पाती,
…………… रावांबरोबर जुळती माझी असंख्या नाती.
अंगणात बहरली नाजूक सुगंधी जाई,
…………… रायांचे प्रेम भरून राहिले दिशा दाही.
क्षितिजावरचे रंग किहीती विरघळणारे,
…………… रावांचे हास्य जणू आभाळावर उमटणारे तारे.
कोवळ्या उन्हाचे कोवळे कवडसे,
…………… सह संसारात सुख येई तसे.
जरासे श्वास, जरासे भास, भासात स्वप्नांचे रंग,
…………… रावांचे बोलणे, जणू अबोध मुके तरंग.
सासरच्या घरी मी आले, दिन सरला संध्या आली,
…………… रावांच्या प्रेमाने गालावर चढली लाली.
सासूबाई म्हणाल्या मला बोल ना लाडक्या सुने,
…………… च्या संसारात काही ना पडो तुला उणे.
लग्नात घातला ह्यांनी सूट आणि टाय,
…………… रावांच्या आईचे शब्द म्हणजे साखर अन साय.
लग्नात पातली दहा तोळ्याची सरी,
…………… चं नाव घेते मला अंबाबाई पावली खरी.
कोजागिरी पौर्णिमेला आकाशात पडलं टिपूर चांदणं,
…………… रावांच्या गळ्यात आहे, क्लासिकल सुरेल गाणं.
माझ्याच संचिताने सारे मिळाले मला,
…………… सह गजानना नमस्कार करते तुला.
केसांमध्ये गुंफली सुगंधी फुलांची जाळी,
…………… रावांच्या नावाने चंद्रकोर लावली भाळी.
पाच पदरी मोहनमाळ, गळ्यात चमके फार,
…………… नी आणला मला, शालू हिरवागार.
अंगभर दागिन्यांची हौस मला फार,
…………… शी विवाह केल्यावर कळलं जीवनाचं सारं.
मराठीमध्ये म्हण आहे, पुणं तिथ काय उणं,
…………… राव म्हणजे माझं शंभर नंबरी सोनं.
Marathi Ukhane for Female Easy💛
ल्याले मी आज सौभाग्याचा साज,
………….. चे नाव घेते नववधू रूपाने आज.
मावळता सूर्य, उगवतो शशी,
………….. ची पत्नी झाले आजच्या दिवशी.
कुमारिकेचा अवतार संपला ,सौभाग्यवतीचा अलंकार आला,
………….. च्या नावाला आज प्रारंभ केला.
कुमारिकेच्या बंधनातून सुटका झाली आज,
…………..नी घातला मला सौभाग्याचा साज.
भाचीच्या लग्नात मामाला मिळतो मान,
………….. बरोबर झाले आज शुभमंगल सावधान.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला,
…………..च्या नावाला आज प्रारंभ केला.
मामा घरी खोदले बळद,
………….रावांच नाव घेऊन लावते हळद.
गणपती पुढे कारंज उडे,
…………. रावांच नाव घेते सत्यनारायणापुढे.
शुभ मंगल कार्यासारखा दिवस येत नाही पुन्हा पुन्हा ,
………….राव घरी नसले की दिवस जातो सुना सुना.
मंगळसूत्र आणि जोडवे सौभाग्याची खूण,
…………. रावांच नाव घेते …………. ची सून.
गुलाबाच फूल बघताच ताज,
………….राव आहेत सौभाग्य माझ.
शिक्षण शिकवतात पिता,घरकाम शिकवते माता,
………….रावांच नाव घेते खास तुमच्याकरिता.
सौभाग्याचा अलंकार लाल कुंकू,काळ्या मण्याची पोत आणि काचेचे चुडे,
………….रावांच नाव घेते सत्यनारायणा पुढे.
घराला असावे अंगण ,अंगणात असावे तुळशी वृंदावन,
………….रावांच्या संसाराचे करीन मी नंदनवन.
जय जया जी गणेशा, शिवगौरीच्या नंदना,
…………… रावांबरोबर तुला सादर वंदना.
कळले मला या मेहंदीतून, जीवनामध्ये रंग भरावे,
…………… सह रंगून जाऊन, जीवनही सार्थ करावे.
कलात्मक मेहंदीने रंगले दोन्ही हात,
…………… रावांना अर्थपूर्ण देईन जीवनभर साथ.
आमराईत फांदीला बांधला झुला ,
…………… रावांबरोबर संसार मी सांधला.
प्राजक्ताच्या झाडाखाली जाधवका संध्याकाळी,
…………… सह ही आली मनास नवीनी
सांजसकाळी गंध जुईचा, वादळ उठवी मनी,
…………… रावांचे नाव सदा मनी मी त्यांची प्रणयिनी.
थरथरते मी, मी बावरते,
…………… च्या हाकेने मी सावरते.
गहन झाल्या सांज सावल्या, पाऊस ओली हवा,
…………… तुम्ही लवकर परतुनी याहो माझ्या जीवा.
लम घटीका किती सुंदर आहे,
…………… रावांचा आनंद हृदयी भरून वाहे.
चिंब पावसात ओली हिरवळ पावलांखाली,
…………… ची कन्या …………… रावांची पत्नी झाली.
आशा भोसलेच्या मैफिलीत उमटतात गोड गीतांचे पडसाद,
…………… ने दिला …………… च्या हाती हात.
संक्रांतीच्या तीळ गुळाची वर्णावी किती गोडी,
…………… आणि …………… ची जमली सुरेख जोडी.
मुला-मुलींच्या सौंदर्यापेक्षा पहावेत त्यांचे गुण,
…………… च्या नावाचं कुंकू हिच सौभाग्याची खुण.
आपुलकीने आणि प्रेमाने बनतात रेशिम गाठी,
…………… रावांचं नाव घेते फक्त तुमच्यासाठी.
सासरच्या घरी सर्वत्र सुखशांती नांदू दे,
…………… बरोबर संसार करतांना, प्रेम निरंतर लाभू दे.
सुंदर शब्दांची गुंफण केल्यावर, बनते सुंदर कविता,
…………… रावांच्या उमद्या स्वभावा आहे सहजता.
यशाच्या शिखरावर पोहचलो तरी करू नये गर्व,
…………… बरोबर संसार करताना, आयुष्य वेचिन सर्व.
मनाला मोहुन टाकते निळाई आकाशाची.
…………… आणि …………… ची जोडी असे आदर्शाची.
चांगलं ऐकाव कानाने, चांगलं पहावं डोळ्यांनी,
…………… बरोबर संसार करताना, प्रेमाने वागाव. …………… रावांनी.
सुविचारांनी मन माझं झोपाळ्यासंगे झुले,
…………… सहवासात मन आनंदाने फुले.
Marathi Ukhane for Female
युगे अठ्ठावीस झाली,विठ्ठल विटेवरी उभा,
…………. राव आहेत माझ्या घराची शोभा.
गणराज गणपती विद्या देते सरस्वती,
…………. राव हीच माझी खरी संपत्ती.
यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवितो बासरी,
…………. रावांच्या जीवावर सुखी आहे सासरी.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात श्री स्वामी समर्थ,
…………. रावामुळे आहे माझ्या जीवनाला अर्थ.
भाग्य उजळल पत्नीच, अंगठीवर चमकला हिरा ,आकाशात चमकला तारा,
……….रावांच नाव घेते हाच माझा भाग्योदय खरा.
पैठणीवर शोभते नाजुक मोरांची जोडी,
……….रावांमुळे आली आयुष्याला गोडी.
सह्याद्री पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन ,
……….रावांच्या प्रेमासाठी अखंड जीवन अर्पण!
चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
……….रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
रिमझिम पडणारा पाऊस,आणि हिरवागार मळा,
अन ……….रावांच्या आपुलकीचा मला लागलाय लळा.
Marathi Ukhane for Female
वनात नाचतो मोर फुलवून पिसारा,
……….रावांसोबत आनंदाने करेन मी संसार सारा.
गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र,
……….रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र.
खोल्यांत खोल्या सात खोल्या , उघडून गेले आत,
मधल्या खोलीत ताट, लाडवानं भरल काठोकाठ,
ताटाला केली खून ,
……….रावांचे नाव घेते ……….ची सून.
शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने,
……….रावांचे नाव घेते मी प्रेमापेक्षा भक्तीने.
आंतरपाटावरील स्वस्तिक मांगल्याची खूण,
……….रावांचे आणि माझे जुळले ३६ गुण.
ताटभर दागिन्यांपेक्षा माणस असावी घरभर,
……….रावांचे नाव घेते आशिर्वाद द्यावा जन्मभर.
दोन वाती एक ज्योति ,दोन शिंपले दोन मोती,
……….रावांची राहो मी अखंड सौभाग्यवती.
आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर ,
आयुष्याचा प्रवास करीन ……….रावांच्या बरोबर.
गळ्यात मंगळसूत्र,मंगळसूत्रात डोरल,
……….रावांचे नाव माझ्या हृदयात कोरल.
Marathi Ukhane for Female
बागेत बाग राणीची बाग,
अन………. रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग.
सकाळी पिझ्झा ,दुपारी बर्गर,
……….राव आहेत माझ्या लाइफ चा सर्वर.
पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले
………. च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.
रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा ,
जीवनाचा खेळ समजला ……….मुळे सारा.
इंग्लिश भाषेला महत्त्व आले फार ,
……….ने माझ्या संसाराला लावला हातभार.
Marathi Ukhane for Female Simple😎
हिंदू संस्कृती,हिंदू राष्ट्र,हिंदू राष्ट्राचा धरीन अभिमान,
………….. बरोबर झाले आज शुभमंगल सावधान.
उगवला चंद्र रजनीला लागली चाहूल,
…………..च्या जीवनात टाकले आज पाऊल.
सनईच्या मंगल सुरांनी लागते मंगलकार्याची चाहूल,
…………..च्या जीवनात टाकले आज पहीले पाऊल.
थोर कुळात जन्मले,सुसंस्कारात वाढले,
…………..च्या जीवनात आज पाऊल टाकले.
सासरचे निरंजन ,माहेरची फुलवात,
…………..चे नाव घ्यायला आज केली सुरुवात.
निळ्या नभावर कर्तृत्वाचा असे रुपेरी ठसा,
………….. सह करीत आहे संसाराचा आज श्रीगणेशा
सुशिल घराण्यात जन्मले कुलीन घराण्यात आले,
…………. रावांना हार घालून सौभाग्यवती झाले.
सुखी संसाराचा प्रत्येकीला वाटतो हेवा,
…………. राव आहेत सौभाग्याचा ठेवा.
सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवनावस्त्र विणले,
………….रावांमुळे मला सौभाग्य लाभले.
Marathi Ukhane for Female
उंबराच्या झाडाखाली गुरुचरित्राचे पारायण,
…………. रावांच नाव घेते आज आहे सत्यनारायण.
जगात नाही एकलव्य सारखा शिष्य,
………….रावांसाठी मागते शंभर वर्षे आयुष्य.
सासू सासर्यांकडून मिळाली आई-वडिलांची माया,
………….राव आहेत माझ्या आयुष्याच्या इमारतीचा पाया.
निळ्या निळ्या आकाशात ढगांची दाटी,
…………. रावांच नाव घेते खास तुमच्यासाठी.
चांदणे शिंपीत रात्र आली,
………….राव मिळाले आणि माझी तपस्या पूर्ण झाली.
आईने शिकवले गृहकृत्य,वडिलांनी शिकवले शिक्षण,
………….रावांची किर्ती हेच माझे भूषण.
लोकशाही तत्वावर चालते राज्य भारत देशाचे,
………….राव पती मिळाले हेच वैभव माझे.
Marathi Ukhane for Female
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
………….राव हेच माझा दागिना खरा.
आगरकरांच्या सुधारणेने स्त्री जीवन धन्य झाले,
………….रावांच्या हाती हात देऊन त्यांच्या घरी आले.
तुळशीचे वृंदावन म्हणजे पावित्र्याचे स्थान
………….रावांनी दिला मला सौभाग्याचा मान.
मंगळत्राच्या कडेने शोभून दिसतात काळे मणी,
………….राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी.
नभांगणी चमकली रोहिणी ,हसला रजनीनाथ,
………….रावांची लाभो जन्मोजन्मी साथ.
इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून,
……….रावांचे नाव घेते ……….ची सून.
नव्या नव्या संसाराचा नाजुक –गोड अनुभवही नवा ,
……….राव व माझ्या संसाराला ,तुमचा अखंड आशीर्वाद हवा.
सनईच्या सुरात,वाद्यांच्या गजरात,
……….रावांचे नाव घेते ……….च्या घरात.
नवीन लग्न झाल्यावर संसाराची वाढते गोडी,
……….ची आणि माझी सुखी ठेव जोडी.
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलतो मायेचा झूला,
……….रावांचे नाव घेते ,सगळे ऐकायला चला.
नऊवारी साडी आहे माझ्या महाराष्ट्रचा मान,
……….राव आहेत माझा जीव की प्राण.
वर्ष जाता जाता लग्नाला नऊ वर्ष झाली ,
पहिले पहिले संसार आनंदाने गेले ,
जन्मा जन्माची साथ, नात्यात उतरली गोडी,
……….राव आणि माझी राजा राणीची जोडी .
सोन्याच्या दागिन्यांनी सजली नवरी,
नवरीच्या गळ्यात नाजुकशी सरी,
मोठ्यांना बोलते नका टवकारू कान,
……….रावांच नाव घेते राखून तुमचा मान.
Marathi Ukhane for Female
सुविचाराने होतो संसार सुखाचा ,
……….रावांचे नाव घेते आशिर्वाद लाभो सर्वांचा.
दारी होता टेबल, त्यावर होता फोन,
……….रावांनी पिक्चर दाखवला “हम आपके है कौन?”.
प्रेमात दुरावा नकोसा वाटतो ,
सहवास एकमेकांचा हवा हवासा वाटतो,
म्हणून सात जन्मासाठि ……….लाच मागतो.
सौभाग्यकांक्षिणी कालची ,झाले सुवासिनी आज ,
……….रावांनी दिला सारा सौभाग्याचा साज.
आधी घातला चंद्रहार मग घातली ठुशी,
……….रावांच नाव घ्यायला माझी नेहमीच खुशी.
सातार्याचे पेढे ,नाशिक चा चिवडा ,
……….राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा.
रायगडावर शिवाजी महाराजांनी तयार केले राष्ट्र,
……….रावांच नाव घेऊन मी म्हणते जय महाराष्ट्र.
मराठी उखाणे स्त्रियांचे💘
संसाराच्या सारीपटावर पडले मनासारखे दान,
………….रावांच नाव घेऊन राखते तुमचा मान.
जन्म दिला मातेने,पालन केले पित्याने,
………….रावांच नाव घेते पत्नी या नात्याने.
दिवसाची सुरुवात करते जोडून सूर्यनारायणाला हात,
………….रावांची लाभो जन्मोजन्मी साथ.
स्वछ्ता आणि टापटीप हीच घराची शोभा,
………….रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा.
चांदीच्या वाटीत पेरूची फोड,
………….रावांचे संस्कार आहेत गोड.
सुखदुःखाच्या चाकोर्यातून हाकावी जीवनाची गाडी,
ईश्वर सुखी ठेवो ………….रावांची आणि माझी जोडी.
सुखदुःखाचा हिशोब ठेवते संसाराच्या वहीत,
………….रावांना आयुष्य मागते सासुसासर्या सहित.
रूसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास,
………….रावांच नाव घेते तुमच्याकरीता खास.
आयुष्यात भागीदार,संसारात साथीदार,
………….राव आहेत माझ्या जीवनाचे जोडीदार.
पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा,
………….राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा.
Marathi Ukhane for Female
कुंकू लावते ठळक,हळद लावते किंचित,
………….राव आहेत माझ्या पूर्वजन्माचे संचित.
कुलिन स्त्रियांना अहंकार नसावा,
………….रावांना तुमचा आशीर्वाद असावा.
ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ,तुकारामाची गाथा,
………….रावांच्या चरणी ठेवते मी माथा.
रत्नजडित सिंहासनावर गणपती राजा,
………….रावांबरोबर केली सत्यनारायणाची पुजा.
कन्व ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,
………….रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर
आंब्याच्या आमरईत असते आम्रवृक्षाची दाट छाया,
………….रावांसाठी झिजविन मी अखंड काया.
स्वराज्याची माळा हिंदमातेच्या गळ्यात,
………….रावांच नाव घेते सुवासिनीच्या मेळयात.
मानवी सेवा हीच खरी ईश्वरी सेवा,
………….रावांकरिता पुनर्जन्म यावा.
धनाने धनवान,गुणाने गुणवान,
………….रावांच्या पत्निपदाचा मला आहे अभिमान.
उगवला भानू,मावळला शशी,
………….रावांची सेवा हीच माझी अयोध्या काशी.
मंगळागौरी मंगळ माते नमन करते तुला,
………….रावांच नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.
रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहीत,
………….रावांना आयुष्य मागते सासुसासर्या सहीत.
सरितेच्या गायनाला पवणाचा सुर,
………….रावाकरिता माहेर केले दूर.
देवाला करते नमस्कार,तुळशीची करते आराधना,
………….राव सुखी राहोत हीच माझी प्रार्थना.
प्रेम द्यावे ,प्रेम घ्यावे ,प्रेमाचा करावा साठा,
………….रावाच्या संसारात अर्धा माझा वाटा.
Marathi Ukhane for Female
ग्रीष्माने तापलेली पृथ्वी वर्षाऋतु मध्ये होते थंड,
………….रावांच्या सहवासात कधी न पडो खंड.
दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस,
………….रावांच नाव घेते आज आनंदाचा दिवस.
जीवनाचे कमळ सुखाने खुलते तसेच दुःखाने कोमेजते,
………….रावांमुळे माझे सौभाग्य खुलते.
विवेकी लोकांच्या समुदयात असतो वीरांना मान,
…………. रावांच नाव घेऊन राखते तुमचा मान.
माझ्या आयुष्याची मी काढीन रूपरेषा,
………….रावांनी त्यात रंग भरावा हीच माझी मनिषा.
दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी,
………….रावांच्या संसारात मी आहे आनंदी.
दाग दागिन्यांची,कपड्या लत्त्याची हौस मनी नसावी,
………….रावांची सावली जन्मोजन्मी असावी.
सासरवाशी मुलीने काम करावे शक्तीपेक्षा युक्तीने,
………….रावांच नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.
द्राक्षांच्या वेलीला त्रिकोणी पान,
बाबा हिंडले हिंदुस्तान ,तेव्हा सापडले ……….राव छान.
आमच्या दोघांच्या नवीन जोडीला आशीर्वाद तुमचा हवा,
……….रावांसोबत आजपासून मी संसार करते नवा.
अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही,
आता आहे ……….रावांची राणी.
आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून ,
……….रावांचे नाव घेते तुमचं मान राखून.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट ,
………. रावांच्या बरोबर बांधली जीवन गाठ.
थोडा गुण सोन्याचा ,थोडा गुण सोनाराचा,
……….रावांनी केला माझा संसार सोन्याचा.
नवीन घरामध्ये मन गेले गांगरून,
……….रावांच्या मायेची शाल घेते पांघरून.
नील नभांगन जणू अंगठी, चंद्र शोभे त्यातला खडा ,
ईश्वर सदा सुखी ठेव, ……….राव आणि माझी जोडी.
Marathi Ukhane for Female Latest 👩❤️👨
ठेविले अनंते तैसेची रहावे,
………….रावांना आयुष्य ईश्वराला मागावे.
गुलाब पाकळी पेक्षा नाजुक असते शेवंती,
………….राव सुखी राहोत हीच ईश्वराला करते विनंती.
मातेची माया आणि पित्याची छाया सोडून आले,
………….रावांच्या सहवासात पूर्ण सुखी झाले.
यमुनेच्या काठी ताजमहलाची सावली,
…………. रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
हुशार माझी मुलगी,गुणी माझा पुत्र,
………….रावांच्या नावाने बांधले मंगळसूत्र.
स्त्रियांचा धर्म पतीची करावी सेवा,
………….राव आहेत माझा सौभाग्याचा ठेवा.
केवड्याच्या बनात नागिणीची वस्ती,
………….रावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती.
शिवाजीने राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने,
………….रावांच नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.
गुलाबाच फूल देठाला कोवळे,
…………. रावांच रूप कृष्णसारखे सावळे.
सासू सासरे दीर नंदा घर केएस भरलेले,
………….रावांच नाव घेते मनामध्ये ठरलेलं.
शंकराची करते आराधना ,देवीची करते उपासना,
………….राव सुखी राहोत हीच माझी प्रार्थना.
Marathi Ukhane for Female
चांदीच्या समईला रेशमाची वात,
………….रावांच नाव घेते पाच मिनिटांच्या आत.
गोपाळपूरचे दही,पंढरपूरची लाही,
………….रावांसारखे पती त्रिभुवनात नाही.
तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून,
………….रावांच नाव घेते …………. ची सून.
द्राक्षाच्या वेळीला त्रिकोणी पान,
………….रावांच नाव घेऊन राखते तुमचा मान.
सीता सावित्री आहेत पतिव्रता ,आपण त्यांच्यासारखे वागावे,
………….रावांसारखे पती जन्मोजन्मी मागावे.
पांडुरंगाच्या मंदिरात हरिनामाचा गजर,
………….रावांच नाव घ्यायला नेहमीच असते हजर.
सोनेरी मोती सीताबाईच्या साडीला
………….रावांच नाव घेते जाऊबाईंच्या जोडीला.
उत्तम कुळी जन्मले ,उच्च कुळी आले ,
……….रावांच नाव घेऊन भाग्यशाली झाले .
मराठी भाषा आहे महाराष्ट्राची अस्मिता ,
……….राव माझे श्रीराम आणि मी त्यांची सीता.
मासे पकडण्यासाठी जमल्या समुद्रावर नौका,
………….रावांचे नाव घेते सर्वजण ऐका.
श्री कृष्णाने लिहिली भगवदगीता,
……….माझे राम मी त्यांची सीता.
खान तशी माती ,
……….राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती.
पुरुष म्हणजे सागर ,स्त्री म्हणजे सरिता ,
……….रावांचे नाव घेते ,तुम्हा सर्वांकरिता.
राम खातो रामफळ,सीता खाते सीताफळ,
कृष्ण खातो दही ,
माझ्या मंगळसूत्रावर ……….रावांची सही.
मंडप रंगला रंगाने ,हात भरला चुड्याने,
……….नाव घेते हळदीच्या अंगाने.
Marathi Ukhane for Female
वेड्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सायको,
……….रावांचे नाव घेते बनून त्यांची बायको.
अंथरली सतरंजी ,त्यावर पांगरली शाल,
……….रावांच्या जीवनात राहील खुशाल.
बिजनेस मध्ये झाला गेल्यावर्षी तोटा,
तरीपण ……….रावांनी उडवल्या लग्नात १००० च्या नोटा.
चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा ,
………. रावांच्या जीवावर मारते मौजा.
काचेच्या ग्लासात घट्ट घट्ट दही ,
माझ्या मंगळसूत्रावर फक्त आमच्या अहोची सही .
मातीत माती ,माझ्या गावातली माती ,
……….रावांच्या नावाचं कुंकू लावलं माथी.
……….ला जाताना लागतो ……….चा घाट,
अख्ख्या गावात नाही ……….रावांसारखा थाट.
Marathi Ukhane for Female
मनाला समाधान देते देवापुढची सांजवात,
संसाराच्या सुखी वाटचाली करता……….रावांच्या हाती दिला हात.
टीप टीप बरसा पाणी,पाणी ने आग लगाई,
……….रावांशी लग्न करण्याची लागली होती भलतीच घाई.
संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,
……….रावांच्या जिवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.
मंगळसूत्रातला झळके हिरा,अंगठीतला चमके खडा,
……….हाच माझा दागिना खरा.
भुंग्यांच्या सहवासात विकसते कळी,
……….रावांच्या साक्षीने लिहिते सौभाग्याच्या ओळी.
गुलाबाच्या झाडांना काटयांचा कहर,
……….रावांनी फिरवले मला संपूर्ण पुणे शहर.
आम्ही आशा करतो की आपणास स्त्रियांनी घ्यायचे उखाणे (Marathi Ukhane for Female Old) या POST मधून उपयोगी माहिती प्राप्त झाली असेल. आपण स्त्रियांनी घ्यायचे उखाणे या वरील लेखावरती आपले मत आणि सूचना खाली दिलेल्या COMMENT BOX मध्ये द्वारे Ukhane Marathi टीम पर्यंत पोहचवू शकता.
मी भरपूर ब्लॉग पहिले पण या ब्लॉगवरचे उखाणे मला खूप आवडले . धन्यवाद