250+ Best Mangalagaur Ukhane । मंगळागौरीचे उखाणे । मंगळागौरीसाठी खास उखाणे

Mangalagaur Ukhane :- मंगळागौरीचे उखाणे या post वरती क्लिक करून आपण Ukhane Marathi या सुप्रसिद्ध वेबसाइट वरती आल्याबद्धल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण नेहमी आपल्या आसपास पाहतो कि मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये स्त्रियांनी उखाणा घेण्याची पद्धत आपल्याकडे आहे. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत मंगळागौरीसाठी खास उखाणे (Mangalagaur Ukhane). या पोस्टमध्ये आपल्याला विविध प्रकारचे उखाणे वाचायला मिळतील.

आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो कि, Mangalagaur Ukhane ही पोस्ट वाचल्यानंतर आपण योग्य ठिकाणी उखाणा घेऊन आपल्या जिवलग व्यक्तीला Special Feel देऊ शकता.

मंगळागौरीचे उखाणे💘

श्रावणसरीत हिरवा साज लेवून सृष्टीदेवी सजली,

…………………… च्या सौख्यास्तव मंगळागौर पूजली.


सौभाग्याची जीवनज्योत प्रीतीतेलाने तेवते,

…………………… ना दीर्घायुष्य मंगलागौरीस मागते.


श्रावण महिन्यातील सण म्हणजे उत्सवाची पर्वणी,

…………………… चं नाव घेते मंगळागौर कारणी.


अशोक वनात सिंह करी गर्जना ,

…………………… सुखी राहोत ही मंगळागौरीकडे प्रार्थना.


मंगळागौरी मंगलमाते वंदन करिते तुला,

…………………… चं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.


वेलीला शोभे फूल, स्त्रीला शोभे अपत्य,

…………………… चं नाव घ्यायला मंगळागौरीच निमित्त.


मोती होऊन सुवर्णाच्या ताटात बसण्यापेक्षा,जलबिंदू होऊन चातकाची भागवावी तहान,

…………………… सोबत केली मंगळागौरीची पूजा महान.


संसाराच्या प्रांगणी प्रीतीची चंद्रकोर,

…………………… च्या सुखासाठी पूजली मंगळागौर.


सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे काचेचे चुडे,

…………………… चं नाव घेते मंगलागौरीपूढे.


प्रत्येक धार्मिक विधीमागे लपलेला असतो खरा अर्थ,

…………………… चं नाव घेते मंगळागौर प्रित्यर्थ.


वर्षाऋतुत हसते धरित्री,

…………………… चं नाव घेते मंगळागौरीच्या रात्री.

Mangalagaur Ukhane💘

निसर्गरम्य श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरते ओटी,

…………………… चं नाव घेते खास तुमच्यासाठी.


मेघमल्हार रंगतोय,श्रावणसर कोसलतेय,

…………………… च्या नावाने मंगळागौर सजतेय.


रामाने जन्म घेतला कौशल्येच्या पोटी,

…………………… चं नाव घेते मंगळागौरीसाठी.


गंगेचे क्षेत्र श्री विश्वश्वर काशी,

…………………… चं नाव घेते मंगळागौरीपाशी.


मंगळागौरी मंगलमाते वंदन करते तुला,

…………………… चं नाव घेते ,अखंड सौभाग्य दे मला.


संसाराच्या देव्हार्‍यात सुख-दुःखाचा खेळ अविनाशी,

…………………… ना दीर्घायुष्य मागते मंगळागौरीपाशी.


आयुष्याचा लावीन दिवा, कष्टांचे घालीन भरण,

…………………… चं नाव घ्यायलामंगळागौरीचं कारण.


दसर्‍याला आपट्याचे पान हृदयमिलन दर्शविते,

…………………… ना दीर्घायुष्यमंगळागौरीस मागते.


समईतील ज्योति ,भक्तिभावाने उजळविते,

…………………… नाव मंगळागौरीपुढे घेते.


आकाशात दाटून आले मेघ ,मोर लागले नाचायला,

…………………… चं नाव घेते मंगळागौरीला.


आम्ही आशा करतो की आपणास गृहप्रवेश उखाणे मराठी (Gruhpravesh Ukhane in Marathi for Female) या POST मधून उपयोगी माहिती प्राप्त झाली असेल. आपण आपले मत आणि सूचना खाली दिलेल्या COMMENT BOX मध्ये द्वारे Ukhane Marathi  टीम पर्यंत पोहचवू शकता.

Leave a Comment