250+ Best Makar Sankranti Ukhane In Marathi For Female | मकर संक्रांति मराठी उखाणे

Makar Sankranti Ukhane In Marathi For Female :- मकर संक्रांति मराठी उखाणे या post वरती क्लिक करून आपण Ukhane Marathi या सुप्रसिद्ध वेबसाइट वरती आल्याबद्धल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण नेहमी आपल्या आसपास पाहतो कि स्त्रियांना मकर संक्रांतिच्या प्रसंगी उखाण्यांची गरज असते. बऱ्याच स्त्रियांना उखाण्याविषयी जास्त माहिती नसते. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत मकर संक्रांति मराठी उखाणे (Makar Sankranti Ukhane In Marathi For Female). मकर संक्रांति मराठी उखाणे (Makar Sankranti Ukhane In Marathi For Female) पोस्टमध्ये आपल्याला विविध प्रकारचे उखाणे वाचायला मिळतील.

आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो कि, Makar Sankranti Ukhane In Marathi For Female ही पोस्ट वाचल्यानंतर आपण योग्य ठिकाणी उखाणा घेऊन आपल्या जिवलग व्यक्तीला Special Feel देऊ शकता.

मकर संक्रांति मराठी उखाणे💘

गोडी घ्यावी गुळापासून ,स्निग्धता घ्यावी तिळापासून,

  ……………. च नाव घेते आशिर्वाद द्या मनापासून.


संक्रांतीच्या शुभदिनी तिळगूळ घ्या बोला गोड,

……………. ची लाभली मला संसारात जोड.


संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर बोराने ओटी,

……………. च नाव घेते खास तुमच्यासाठी.


स्नेहामधला मधुर गोडवा टिकावा वर्षभर,

……………. च नाव घेते पाळी आली ……………. वर.


संक्रांतीच्या सणाला येतात नटून बायका,

……………. च नाव घेते सर्वजण ऐका.

06 250+ Best Makar Sankranti Ukhane In Marathi For Female मकर संक्रांति मराठी उखाणे

Makar Sankranti Ukhane In Marathi For Female👩‍❤️‍👨

तिळगूळ घ्या गोड बोला,संक्रांतीच्या शुभेछा देते गोडीन,

……………. च नाव घेते प्रेमभाव भक्तीन.


संक्रांतीच्या सणाला लागतात गाजर ,बोर, ऊस,

……………. बरोबर संसारात मी आहे खुश .


नवीन वर्षाच स्वागत केल ,उत्साहाला आल उधाण,

……………. नाव घ्यायला आज संक्रांतीच कारण.


भ्रमर करतो गुंजारव, मधाने भरतो पोळी,

……………. नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेळी.


संक्रांतीच्या सणाला करतात हलव्याचा साज ,

……………. मुळे झाले मी सौभाग्यवती आज .

05 250+ Best Makar Sankranti Ukhane In Marathi For Female मकर संक्रांति मराठी उखाणे

Marathi Ukhane for Female Sankranti Special🥰

अंबे जगन्माते वंदन करते तुला ,

……………. नाव घेते संक्रांतीच्या सणाला .


तिळासारखा असावा स्नेह,गुळासारखी असावी गोडी,

ईश्वर सुखी ठेवो माझी आणि ……………. रावांची जोडी.


तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज,

……………. रावांच नाव घेते संक्रांत आहे आज.


ताजमहाल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल,

……………. रावांच नाव घेते संक्रांतीकरीता स्पेशल.

04 250+ Best Makar Sankranti Ukhane In Marathi For Female मकर संक्रांति मराठी उखाणे

Sankranti Che Ukhane Marathi Madhe💛

संक्रांतीचा हलवा कागदाच्या पुड्यात,

……………. रावांच नाव घेते मैत्रिणीच्या वाड्यात.


संक्रांत किंक्रांतीच्या आधी असते भोगी,

……………. रावांच्या सेवेला सदा असते उभी.


संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्याचा मान,

……………. रावांच्या जिवावर देते हळदीकुंकाच वाण.


आईसारखी माया जगात नसते कुणाला,

……………. रावांच नाव घेते संक्रांतीच्या सणाला.

03 250+ Best Makar Sankranti Ukhane In Marathi For Female मकर संक्रांति मराठी उखाणे

संक्रांतीचे उखाणे मराठी😎

संसाररूपी जीवनात सासुसासरे आहेत हौशी,

……………. रावांच नाव घेते संक्रांती दिवशी.


उगवली प्रभात विहंग उडाले गात,

……………. रावांच्या जीवावर करते मी संक्रांत.


वैजनाथाची परळी,विश्वनाथाची काशी,

……………. रावांच नाव घेते संक्रांती दिवशी.


मावळला भानू ,उगवला शशी,

……………. रावांच नाव घेते संक्रांती दिवशी.

02 250+ Best Makar Sankranti Ukhane In Marathi For Female मकर संक्रांति मराठी उखाणे

Makar Sankranti Che Marathi Ukhane💘

हळदी कुंकाचा थाट असतो संक्रांतीच्या सणाला,

……………. रावांच नाव घेते म्हणताल त्या क्षणाला.


पौर्णिमेच्या चंद्रभोवती चांदण्याची दाटी,

……………. रावांच नाव घेते खास संक्रांतीसाठी.


सुवासिनीचा सण असतो वटपौर्णिमा आणि संक्रांत,

……………. रावांच नाव घेते आज आहे किंक्रांत.


रुक्मिणीने पण केला श्रीकृष्णाला वरीन,

……………. रावांच्या जीवावर संक्रांत आनंदाने करीन.

01 250+ Best Makar Sankranti Ukhane In Marathi For Female मकर संक्रांति मराठी उखाणे


आम्ही आशा करतो की आपणास मकर संक्रांति मराठी उखाणे (Makar Sankranti Ukhane In Marathi For Female ) या POST मधून उपयोगी माहिती प्राप्त झाली असेल. आपण आपले मत आणि सूचना खाली दिलेल्या COMMENT BOX मध्ये द्वारे Ukhane Marathi  टीम पर्यंत पोहचवू शकता.

3 thoughts on “250+ Best Makar Sankranti Ukhane In Marathi For Female | मकर संक्रांति मराठी उखाणे”

Leave a Comment