25+ Best Long Ukhane in Marathi for Female Marriage | मोठे उखाणे

Long Ukhane in Marathi for Female Marriage :- मोठे उखाणे या post वरती क्लिक करून आपण Ukhane Marathi या सुप्रसिद्ध वेबसाइट वरती आल्याबद्धल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण नेहमी आपल्या आसपास पाहतो कि  महिलांना व पुरुषांना विविध प्रसंगी उखाणे घेण्याची महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे. घेतलेला उखाणा जर मोठा असेल तर तो त्या प्रसंगाची शोभा आजून वाढवतो.  म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत मोठे उखाणे (Long Ukhane in Marathi for Female Marriage). या पोस्टमध्ये आपल्याला विविध प्रकारचे मोठे उखाणे वाचायला मिळतील.

आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो कि, Long Ukhane in Marathi for Female Marriage ही पोस्ट वाचल्यानंतर आपण योग्य ठिकाणी उखाणा घेऊन आपल्या जिवलग व्यक्तीला Special Feel देऊ शकता.

Long Ukhane In Marathi For Female Marriage

महादेवाच्या मंदिरावर सोन्याचा कळस,

श्री हरीला वाहते प्रेमाने तुळस,

तुळशीला बाई सुंदरसे वृदांवन,

प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन भूमी तपोवन,

तपोवन साधुसंताची भूमी महान,

गोदावरी भागवते नाशिककरांची तहान,

नाशिकची द्राक्षे गोडच गोड,

नाशिकच्या सौदर्याला नाही कशाचीच तोड,

सौदर्य सौदर्य देखन माझ रूप,

देवपुजा करते लावून अगरबत्ती आणि धूप,

देव ब्राम्हणाच्या साक्षीने …… रावांसोबत फेरे घेते सात, आणि मागते जन्मभरासाठी हात.


आंबा मोहरला पानोपानी,

त्याला लागल्या कैन्या,

कैन्याला आला पाड,

आंबा झाला ग्वाड,

आंब्याचा केला रस,

जेवायला केली आरास,

आराशीला काढली रांगोळी,

………. बसले जेवायला,

साता जन्माचे सौभाग्य माझ्या भाळी.

मोठे उखाणे

एक होती नगरी नगरीत होत तळ,

तळ्याजवळ होता कंदील,

कंदीलाजवळ होता शिपाई,

शिपाई जवळ होता वाडा,

वाड्यात होता पाडा,

पाड्याजवळ होता घोडा, तिथं होता चौक,

चौकात होतं देऊळ महादेवाचं, तिथं होती खुंटी,

खुटींवर होत सोळ,

सोळ्यावर होती चोळी,….. रावांची भोळी.


मांडवाच्या दारी उभी होते सुवासिनीच्या मेळ्यात,

नवरत्नाचा हार आहे आजीबाईच्या गळ्यात,

मामंजीच्या मंदिलाला मोत्यांचा तुरा,

आत्याबाईच्या पोटाला जन्मला हिरा,

परसदारी होती तुळस, तिथे सापडला कळस,

पायी पैंजणी, भार कंबरी,

कमरपट्ट्याचा गोफ, वर निऱ्याचा चोप,

माझा बसायचा झोक, मला आलं हसू,

मी हसले गालातल्या गालात,

मला विचारलं रंग महालात,

रंग महालाची हवा काय?

रंगीत पाट बसायला,

दिल्लीचा आरसा पहायला,

इतकं शहाणपण किती, पुण्याचा कारभार हाती,

मातीच सोनं, सातताळ माडी, खाणला आड,

लावलं रामफळाचं झाड, त्याला आले मोती

……… चं नाव घ्यायला अवघड किती.

01 25+ Best Long Ukhane in Marathi for Female Marriage मोठे उखाणे

Long Ukhane In Marathi For Female Haldi Kunku

नाकात नथ, पायात जोडवी,

पैठणी नेसले लक्ष्मीसारखी,

कानात कुड्या, हातात पाटल्या,

बांगड्यामध्येच किणकिणती,

वेणीत खोपा, नऊवारी साडी,

कपाळी चंद्रकोर कोरलेली,

भांगात कुंकू ,हातात तोडे,

गळ्यात चंद्रहार मनी शोभतो,

साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते,

आणि….. नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते!

शिवरायांचे स्वराज्य, जिजाऊंचे स्वप्न,

संभाजींचा पराकम, पेशव्यांची जिद्द सावित्रीचा निर्धार, महात्मा फुलेचा आधार टिळकांची बंडखोरी,

गांधी मवाळ अभिमान वाटतो यांच्या शौर्यगाथा ऐकूण……रावांच नाव घेते सर्व महात्म्यांना नमन करुन.


खंडाळ्याच्या घाटात गार गार पाण्याचा झरा,

तेथे नेहमी शिवाचा पहारा,

कर्जतपासून कोकणपट्टीला भार लागला सारा,

कल्याण कॅम्पात निर्वासी भरला सारा,

घाटकोपरला बिजलीच्या तारा,

दादरला नेहमी पोलिसांचा पहारा,

कॉफर्ड मार्केटला ट्राम (रेल्वे) धरा,

राणीच्या बागेत विश्रांती करा,

भायखळ्याला जाताना चढ लागला सारा,

मार्कटच्या घड्याळात वाजले बारा,

चांभारगोदीत बोटी आल्या तेरा,

बोरी बंदरला गादीचा आगार झाला,

चौपाटीला सुटला मंजूळ वारा,

साहेबाच्या बंगल्याची निरनिराळी तन्हा

……….चे नाव घ्यायला रुपये लागतात एकेशे तेरा.

जानपद उखाणे

जाई जुईच्या फुलांची विणलेली आहे जाळी,

देवाच्या नैवेद्यासाठी आहेत पिवळीधमक केळी, पंचामृतच्या फुलपात्रात आहे चांदीची पळी,

सभोवताली जमलेली आहेत आरतीसाठी मित्र मंडळी, आनंदाने पडत आहे टाळी वर टाळी,

सर्वांमुळे पूजेला शोभा आली आगळी वेगळी,

आणि एवढ्या मोठ्या उखाण्यात …. रावांच नाव

विसरायला मी का आहे वेडी खुळी.


बाग लावला परोपरी, आत झाडे तरोतरी,

आंब्याला लागल्या कैऱ्या, उंबर लागले पिकायला,

कडवट आंबट, संत्री मुळमट,

काशीमागून फणस, लिंब, डाळिंब आले रसा,

चला जाऊ ऊसा ,

कुठेतरी नौकरी करा, साडी माझी पैदा करा,

बसेन तोवर बसेन, नाहीतर जाईन माझ्या माहेरा,

माझं माहेर बेगमपुरी, मला दिले मोठ्या घरी,

गळ्यात काय मोहनमाळ, गळ्यात चंद्रहार,

अंगात चोळी लाल, त्याची हरभऱ्याची गाठ,

काय सांगू संपत्तीचा थाट, वाड्यात वाडे सात वाडे,

बोलवायला गेला मोहनमाळी, आधी वाढते म्हैसूरपाक,

पुन्हा वाढते केशरी भात, पुन्हा वाढते तिखट भात,

बारा प्रकारच्या बारा भाज्या, आवटीची शेंग, कवटीची शेंग, मुळा, कांदा, टाकून, बनवत रहा, अळूची पाने तळून, स्टीलच्या ताटात चौपदरी चपातीची घडी,

निरशा दुधातली बासुंदी घ्यावी थोडी,

अमेरीकी खीर, गोड सुधारस केला बाई,

लिंबू पिळायची आठवण नाही

………… नाव ऐकतात दिशा दाही.

Long Ukhane In Marathi For Female Griha Pravesh

हळदीकुंकू लेते सुवासिनीच्या मेळ्यात,

गुलाबाचे फूल माळ्याच्या मळ्यात,

नऊ तोळ्याचा हार, आत्याबाईच्या गळ्यात,

आत्याबाईच्या पोटचे, भाऊजीच्या पाटचे, मुख्यमंत्र्याचे मित्र

……..रावांच्या जीवावर लेते मणी मंगळसूत्र.


सारवलेल्या अंगणात, सुंदर रेखाटली रांगोळी,

नाव घेते ऐका, आता माझी पाळी,

सुन कुणाची ………. ची ,

लेक कुणाची ……….ची,

राणी कुणाची भ्रताराची, भरतार म्हणे का ग रुसली,

मणी, जोडवे, बिछवे, पैंजण घाला हिला कुणी,

कडे, तोडे, पाटल्या, गोठ माझे भारी,

पैठणची पैठणी मागवा, जरतारी वजरटीक ठुशी,

मोहनमाठ गळा, जमलाय माझ्या सख्याचा मेळा, सुवासिनीचं लेणं मंगळसूत्र काळी पोत,

सासर माहेरचं जमलं गणगोत,

कुडकं, बुगडी, वेल, कुड्या,

स्वारीच्या जीवावर नेसते रेशमी साड्या,

भांगात बिंदी, खोप्यावर गुलाबाचं फूल,

कानात माझ्या मोतीपावळ्याचं डूल,

वजरटीक, गळ्यात घातली ठुशी,

ह्यांच्या खुशीतच माझी खुशी,

पोहे हार, कोल्हापुरी साज, जळगावची वाकी

…………. च्या संसारात कुठली हौस राहिली नाही बाकी.

Long Marathi Ukhane For Female Funny

काळी चोळी विणकर पुण्याची,

ती होती बरी मी नव्हते घरी,

 चांदीचे कपाट, सोन्याचा हात,

 आत उघडून बघते जिया-साळीचा भात,

 भातावर तूप, तुपसारखं रूप, रुपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढा

 ……… रावांच नाव घेते वाट माझी सोडा.


झुल झुंबराचं, फुल उंबराचं,

ऐंशी द्रोण नउशे झारी,

वाजत-गाजत रुकवत गेला पाटलाच्या आळी,

पाटील म्हणतात नाव घ्या, नाव कुठं फुकट,

हळदीच्या वाट्या, कुंकाच्या चिटया,

पानाचं पुंड, दाळीचं वडं,

भात भाताची, कडी ताकाची,

वडी लाखाची, लेक कुणाची आई बापाची,

सुन कुणाची सासू सासऱ्याची,

राणी कुणाची भ्रताराची,

नाजूक पोळ्या साजूक तेलच्या,

ऐंशी सांडगा, नपुसगिरी पापड,

जिऱ्या साळीचे तांदूळ दोन्ही आणे बरोबरी,

बर्फी, बुंदी, जिलभी न्यारी,

साखर, सुजी तिनशे पुरी,

चांदीची घंगाळी आंघोळीला,

नकीचं धोतर नेसायला,

चंदनाचा पाट बसायला,

सान निवळीची, खोड बडोद्याचं,

वरती गंध कोशिंबिरी, पाची पक्वानानं भरलं ताट,

समया जळत्यात तीनशे साठ,

पान नालगावचं, सुपारी कोकणाची,

कात लोकरचा, चुना भोकरचा,

लवंग काशीची, विलायची बीडची

मी हसले घरात मला पुसलं रंग महालात

केजच्या कचेरी खांदला आड,

त्याला बाजूबंदी छंद

 ……… चं नाव घेते गलका करा बंद.

02 25+ Best Long Ukhane in Marathi for Female Marriage मोठे उखाणे

Long Marathi Ukhane For Male

झुल झुंबराचं, फुल उंबराचं, बोलणं पिंपळाचं,

पोळी गव्हाची, बहीण भावाची,

लेक कुणाची, आई-बापाची,

सुन कुणाची, सासू-सासऱ्याची,

राणी कुणाची, चतुर भ्रताराची,

नाव कोण घेते ……….. बाईची लेक,

नाव कोण घेते बहीण ……..ची ,

नाव काय घेती ………. राव ,

कोण हाय शहाणी ……….. राणी.


नाव मोठं भारी, शहापुरात केली न्याहरी,

पुण्याचं काढल तिकिट, मुंबईत घेतलं पाकिट,

पाकिटाला पाकिट दाटलं, जालन्यात घेतलं पुतळ्याचं गाठलं,

पुतळ्याच्या गाठल्याची हौस बीडात घेतली वजरटीक सौंस, वजरटीकीचा गोंडा लाल, कुसुंबात घेतला चप्पलहार, चप्पलहाराला लागत्यात रुपय हजाराच्या वर,

माजलगावात घेतला एकदानी सर,

एकदानी सराची खुशी, तुळजापुरात घेतली ठुशी,

ठुशीला पडल्या जाळ्या, पंढरपुरात घेतल्या कातरबाळ्या, कातरबाळ्याची घडमोड, कुर्डुवाडीत घेतला बुगड्याचा जोड बुगड्याच्या जोडीचा इनकार, झुबं फुलाचा शिनगार,

झुबं फुलाचं मोती, नथ केली राती,

नथीचा फासा, औरंगाबाद मोरणीचा ठसा,

औरंगाबाद मोरनीचा पैका, पाथरीत गाऱ्हाणं ऐका,

जोडवे केले रोषीनं, तोडे केले खुशीनं,

रोष मोठा वाईट, नगरी निघाली चैनाची साईट,

चैनाचा जोड दिसतो  सुना, मामंजी इंग्रजी छड्या आणा, इंग्रजी छडीची घडनावळ, मामंजी नाजूक गोप आणा,

सर्व दागिन्याचा केला मोठेपणा,

आकड्याचा केला खोटेपणा,

शहरना शहर पाहिलं, कमरेच्या साखळीचं ध्यान नाही राहिलं,

गल्ली ना गल्ली पाहिली, मंगळसुत्राची आठवण नाही राहिली,

मामाजी गेले सोलापूरा, सोलापूरहून आणल्या साड्या, साड्याला दिला रंग ………नाव घ्यायला सभा झाली दंग.

Janpad Ukhane In Marathi

हंड्यावर हंडे ठेवले सात,

पाण्याला जाताना शिजत घातला भात,

पाणी शेंदता-शेंदता तोल की गेला,

 काय सांगू तुम्हाला धनीन हात दिला,

 माहेरच्या आठवणीनं डोळं डबडबलं,

 खरं सांगते तुम्हाला धनीन डोळं पुसलं,

 सुंदर कर्तृत्ववान धनीचा मला वाटतो अभिमान

……….. चं नाव घेते तुमचा मान राखून

…………  नी दिले मला सौभाग्याचं दान.


काळी चंद्रकला नेसते खेचून, ९ भार जोडवी पायात ठसून, ही कशाची खूण…….यांची सून,

त्याचं मला हसू,……. माझी सासू, तिने आणला खाऊ…….माझी जाऊ ,

………. माझा भाऊ, त्याने आणली माहेरची कणसं

………चं नाव घ्यायचा असाच यावा चान्स.

Ukhane Long Marathi

इरुद्या, कोयऱ्या कूट जोडवी,

पायी साखळ्याचंकडं, पायझुब्या दंड,

हाती पाटल्याचं फासं दाटले,

हिरकणीला ५०० रु. आटलं,

तांदळाचं मणी, सरपदर दोन्ही, 

थोरलं डोरलं, धाकलं डोरलं,

थोरल्या डोरल्याला वाघनक्या,

वाघनकीला मोत्याचा घोस,

सरीमाळचा बंदोबस्त चक्री बुगड्या,

कुलुपी गेट, झुबं फुलाचं,

मोडलं कोड, सरजाची नथ मला दंड,

ठुशी गरसुळीचे गोंडं रेशमांनी आवळलं

………. नावाला चंद्र, सूर्य मावळलं.

Janpad उखाणे

माळ्याच्या मळ्यात गुलाबाचे फुल फुलते,

नवरत्नाचा हार गळ्यात घालते,

अंथरल्या छड्या, पितांबराच्या घड्या,

पाच खिडक्या, रंगीत दार,

तिथ खेळंत तान्हं बाळ, तान्ह्या बाळाची सुपारी,

सुपारीला पैका ………. चं नाव घेते सर्वजण ऐका.

Janpad Ukhane

कौलारु माडी, काचेचे आरसे लावा त्याला,

हाजाराची पैठणी मला,

त्यांना गुलाबी सदरा मुंबईहून पार्सल केला,

घडीच्या चोळीला चाटी केला,

कारलं, डोरलं वर सुवर्णाची सर वजरटिकी मोती चार,

इरद्या कोयऱ्याला दिला इसार,

त्याला इसाराची खूण दावा,

चंद्रभागेला चलतात नावा,

आधी आळंदीला जावा, मग शिंगणापूरला जावा, शिंगणापूर गेले, महादेवाचे दर्शन केले,

आनंद झाला फार, जरीच्या पदराची हवा लागे गार,

नसेल कुसूम पुरी जन्मले शिखर पार्वती

Lamb Ukhane

लावा चंदन ज्योती, चंदन ज्योतीला तेल नव्हते घ्या पाणी,

त्यांनी घेतल्या तुरी, आई पाडली, शाळा केली, पुरी माझी शाळा,

एच-एस-सी त्यांची शाळा, एच-एस-सी ला सुख,

बी-एस-सी ला दुःख, पुस्तकाला वास येतो गाईच्या खुराकाचा,

 वास येतो मधुर, तुम्ही घ्या पोथी, मी करते निवड,

 राम गेले वनवासाला, राज्य दिले भरताला

 ……….नाव घेते तुमच्या सगळ्याकरिता.

Lamblachak Ukhane In Marathi

झुल झुंबराचं, फुल उंबराचं,

कडी ताकाची, वडी लाखाची,

लेक कुणाची आई बापाची,

सुन कुणाची सासू सासऱ्याची,

राणी कुणाची भ्रताराची,

नाजूक तेलच्या, साजूक पुऱ्या,

चौरंग टाकले, टाकले पाट ,

…….. बसले पुजेला समया लावल्या तीनशे साठ.

Mothe Ukhane In Marathi

कण-कण फुगली, मन-मन माती,

उतरल्या भिंती चितरले खांब,

आत्याबाईच्या पोटी जन्मले राम, राम गेले शेतात,

शेतातून आणल्या करडी, करडीत झाल्या आरडी,

आरडीचं केलं तेल, तेल ठेवलं शिक्यावर,

शिक तुटलं, मडकं फुटलं, वगळ गेला परसदार, परसदाराचा पैका नाव कोण घेतं ऐका,

नाव कोण घेती एक  …….ची लेक,

नाव कोण घेती गहीण…….ची बहीण,

नाव कोण घेती कंथनी…….. ची पुतणी,

नाव कोण घेती काशी…….. ची मावशी,

नाव कोण घेती तानी ……. रावांची राणी.


आम्ही आशा करतो की आपणास मोठे उखाणे (Long Ukhane in Marathi for Female Marriage) या POST मधून उपयोगी माहिती प्राप्त झाली असेल. आपण आपले मत आणि सूचना खाली दिलेल्या COMMENT BOX मध्ये द्वारे Ukhane Marathi  टीम पर्यंत पोहचवू शकता.

Leave a Comment