250+ Best Latest Ukhane in Marathi for Male | पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male :- पुरूषांसाठी उखाणे (Latest Ukhane in Marathi for Male) या post वरती क्लिक करून आपण Ukhane Marathi या सुप्रसिद्ध वेबसाइट वरती आल्याबद्धल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण नेहमी आपल्या आसपास पाहतो कि पुरूषांनाही स्त्रियांप्रमाणे उखाण्यांची गरज असते. बरेच पुरुष मंडळीना उखाण्याविषयी जास्त माहिती नसते. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत पुरूषांसाठी उखाणे (Latest Ukhane in Marathi for Male). पुरूषांसाठी उखाणे (Latest Ukhane in Marathi for Male) या पोस्टमध्ये आपल्याला विविध प्रकारचे उखाणे वाचायला मिळतील.

आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो कि, Latest Ukhane in Marathi for Male ( पुरूषांसाठी उखाणे) ही पोस्ट वाचल्यानंतर आपण योग्य ठिकाणी उखाणा घेऊन आपल्या जिवलग व्यक्तीला Special Feel देऊ शकता.

पुरूषांसाठी उखाणे

शंकरासारखा पिता ,गिरजेसारखी माता ,
…………. रानी मिळली स्वर्ग झाला आता.


श्रावण महिन्यात असतात खूप सण,
…………. ला सुखात ठेवीन हा माझा प्रण.


काही शब्द येतात ओठातून,
……………………. चं नाव येतं मात्र हृदयातून.


कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,
मी भरवितो ……………………. ला जलेबी चा घास.


पुरणपोळीत तुप असावे साजुक,
…………………….आहेत आमच्या फार नाजुक.


लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
…………………….ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.


सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,
…………………….मला मिळाली आहे अनुरूप.


…………………….माझे पिता …………………….माझी माता,
शुभमुहूर्तावर घरी आणली …………………….ही कान्ता.


जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध,
…………………….च्या सहवासात झालो मी धुंद.


क्रिकेट खेळताना बघत असते खिडकीत बसून,

………. चे नाव घेतो मी तुझा विराट कोहली आजपासून.


आमच्या लग्नासाठी नाही केला कोणी अपोज,

……….  ला मारतो आज सगळ्यांसमोर प्रपोज.


श्रावणी बिल्डिंग ,तिसरा मजला,घर नंबर -११,घराला लावली घंटी,

……….  रानी माझी बबली आणि मी तिचा बंटी.


पुणे तेथे नाही काही उणे ,

……….  राणी गेली गावाला तर घर होते सुनेसुने.


पूर्वेकडून आला वारा, पश्चिमेकडून आला पाऊस ,

……….  राणीला लग्नाच्या आधीपासून साडी नेसण्याची खूप होती हाऊस.


कपाळावर कुंकू दिसेल उठून,

सगळे विचारतात ……….  येवढी सुंदर बायको भेटून कुठून.


तू माझी शोना ,मी तुझा बाबू,

……….  राणी झाली कायमची माझ्या संसारात काबू.


माझ्या मनात बघून ती ओळखते सारे ,

……….   सोबत आहे माझे नाते न्यारे.

01 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male

उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात,
नवनांचा हार …………………….च्या गळ्यात.


रुप्याचा लोटा सोन्याची झारी,
असली काळीसावळी तर …………………….माझी प्यारी.


सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप,
…………………….मिळाली आहे मला अनुरुप.


निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात,
अर्धागिनी म्हणुन …………………….ने दिला माझ्या हातात हात.


सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग,
…………………….माझी नेहमी घरकामात दंग.


तुरीच्या डाळीला,जिर्‍याची फोडणी,

बघताचक्षणी प्रेमात पडलो , ……….ची लाल ओढणी.


सिव्हिल इंजीनियर बनायला लागले खूप कष्ट,

……….चे नाव घेतो ,सर्वांसमोर स्पष्ट.


तार्‍यांच लुकलुकण चंद्राला आवडलं,

……….ला मी जीवनसाथी म्हणून निवडल.


गोड गोड पुरणपोळीत तूप असावे साजूक ,

……….आहे माझी फारच नाजुक.


ती सोबत असली की खराब मूड होतो बरा,

……….मुळे कळला जगण्याचा आनंद खरा.


लग्नाचा वाढदिवस करु साजरा,

……….तुला आणला मोगर्‍याचा गजरा.


हत्तीच्या अंबरीला मखमली झूल,

माझी……….नाजुक जसे गुलाबाचे फूल.


जाई-जुईच्या फुलांचा दरवळला सुगंध ,

……….च्या सहवासात झालो मी धुंद


देवाजवळ करतो मी दत्ताची आरती ,

……….माझ्या जीवनाची सारथी.


वेडा झालो तुझ्या प्रेमात यात माझा काय गुन्हा

………. राणीसारखी बायको भेटू दे मला सात जन्मी पुन्हा .


काय सुंदर सजली होतीस गुढीपाडव्याच्या सणात,

……….पहिल्या नजरेतच बसलीस माझ्या मनात.


 एसटी ला म्हणतात लोक लाल परी,

 ……….राणी आहे माझ्यासाठी सोनपरी.


लग्नात लोकांना बसायला कमी पडल्या खुर्च्या,

……….आणि ……….ची होऊदे गावात चर्चा.


सुंदर जुन्या आठवणी ताज्या करायच्या आहेत,

……….तुझ्यासोबत राहून एक एक स्वप्न पूर्ण करायची आहेत.


शोभून दिसतो मुलींना मराठमोळा साज ,

आणि ……….चे सौंदर्य करते माझ्या मनावर राज.


तुझ्या निरागस बोलण्याला कसलीच तोड नाही आणि

आता फक्त ……….तुझ्यशिवाय मला कसलीच ओढ नाही.


सौंदर्य न बघता मन बघून तुला निवडले,

……….चे हे रूप फार मला आवडले.


हो नको करता करता लग्न टाकलं उरकून,

……….ला निवडले बर्‍याच मुली पारखून.


गेलो जेव्हा पाहायला नव्हती ती नटली ,

तरी ……….मला एका नजरेतच पटली.

02 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male

देवाच्या देव्हार्‍यात फुलांना प्रथम स्थान,

……….ने दिला मला पतिराजांचा मान.


दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते ,

……….च्या एका स्माइल ने दिवसभराचे टेंशन पळते.


तू दिसतेस खूप सुंदर साडीवर ,

……….तुला बायको बनवून फिरवेन गाडीवर.


जीवनरुपी सागरात सुखदुःखाच्या लाटा,

सुखी संसारात सौ ………. चा अर्धा वाटा.


 झुळझुळ झुळझुळ वाहे वारा ,मंद चाले होडी ,

आयुष्यभर सोबत राहो ………. ची जोडी.


देवाला भक्त करतो मनोभावे वंदना ,

………. मुळे झाले संसाराचे नंदन.


दोन जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी ,

………. चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.


जिजाऊसारखी असावी माता,शिवबा सारखा असावा पुत्र ,

राणीच्या गळ्यात आज मी बांधतो मंगळसूत्र.


हातात हात घेऊन अग्नीला साथ फेरे घालतो,

राणीसोबत मी आज सप्तपदी चालतो.


आजपासून सुरू झाला आमच्या संसाराचा जीवन प्रवास,

 राणीला भरवतो जिलेबीचा घास.


रस्ता अडवायला जमल्या  सगळ्या बहिणी,

येऊ द्या घरात आणली तुमची वहिनी .


लक्ष लक्ष दिव्यांसारखे उजळत राहो आमचे प्रेम,

राणीची माझ्या हृदयात कोरली एकमेव फ्रेम.


सजवून आणली गाडी पण ……….ला नेऊ कसे,

सांगा करवल्यानो देताय का पेट्रोल टाकायला पैसे.


नवकोर शर्ट शिलाईत उसवल,

……….नि मला मेकअप करून फसवल.


उरकल लग्न ,वराडाच झाल जेवून,

……….जर रुसली तर एक देईल ठेऊन.


आली जेव्हा समोर वाटलं स्वर्गातील अप्सरा,

मेकअप उतरल तेव्हा दिसला ………. चा चेहरा खरा॰


विनवण्या केल्या सासर्‍याच्या किती ……….च्या पायी,

करवल्या बघून वाटते उगाच केली घाई.


एंग्रजीत चंद्राला म्हणतात मून ,

मला नव्हतं ……….शी करायच लग्न पण आईला आवडली सून .


पडता पडता पाया दुखायलालागली कंबर,

……….पेक्षा करवली एक नंबर.


उखाणा घ्यायला नाही खात भाव,

……….च नाव घेतो आधी जेवणावर मारुद्या ताव.

03 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male

निळे पाणी ,निळे डोंगर,हिरवे हिरवे रान,
………….. च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.


मायमय नगरी,प्रेममय संसार,
…………. च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार.


संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी,
…………. ने लावली मला संसाराची गोडी.


मुखी असावे प्रेम ,हातामध्ये दया,
…………. वर जडली माझी माया.


रसाळ पाहिजे वाणी,स्त्री पाहिजे निर्मला,
…………. च्या नावाचा लागला मला जिव्हाळा .


काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध ,
…………. जीवनात मला आहे आनंद.


संसाररूपी सागरात पती-पत्नी नौका,
…………. नाव घेतो सर्वजण ऐका.


बशीत बशी कप बशी,
…………. सोडून बाकी सगळ्या म्हशी.


कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात ,
…………. नाव घेतो स्त्री –पुरुषांच्या मेळयात.


गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
…………………….आहे माझी ब्युटी क्वीन.


संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,
…………………….चे नाव घेतो सर्वजण ऐका.


नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
…………………….झाली आज माझी गृहमंत्री.


दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
सौ…………………….सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.


मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
…………………….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.


मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
…………………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.


शिक्षण पूर्ण करून पूर्ण करायच होत स्वप्न पण

……….जाईल हातची म्हणून उरकल आधी लग्न.


चिंच लागते आंबट ,चिकू लागतात गोड ,

आता वाटतेय चांगली पण ……….ची लग्नानंतर कळेल खोड.


मुलगी पहायची जबाबदारी मामावर सोपवली,

……….ला गेलो पाहायला तर बारकी बहीण लपविली.


मोठ्या असो की धाकट्या ,

……….च्या करवल्या सार्‍याच नकट्या.


गेली धावतच एकल जेव्हा नाव ,मी बसलो वाट पाहत आणि

……….मारून आली लाडू वर ताव.


नाव घ्या नाव घ्या म्हणत करवल्या बसल्यात घेरून ,

……….च नाव घेतो आलोच एक पॅक मारून.


झाल लग्न ,पार पडले सर्व रीती-रिवाज ,

……….आता देईल मला अहो म्हणून आवाज.


पांढरी पॅंट, काळा पट्टा,

……….जर रुसली तर देईन एक रट्टा.


झाल आपल लग्न देव पावला नवसाला ,

……….नाव घेतो लग्नाच्या दिवसाला.

04 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male

मायामय नगरी, प्रेममय संसार,
…………………….च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.


राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास,
मी देतो…………………….ला लाडवाचा / करंजीचा घास.


जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र,
…………………….च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.


जाईच्या वेणीला चांदीची तार,
माझी …………………….म्हणजे लाखात सुंदर नार.


अस्सल सोने चोविस कॅरेट,
…………………….अन् माझे झाले आज मॅरेज.


जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार रथावर …………………….सारथी.


हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी,
…………………….च्या जीवनात मला आहे गोडी.


मातीच्या चुली घालतात घरोघर,

……….झालीस माझी आता चल बरोबर.


आंब्यात आंबा हापूस आंबा ,

अन आमची ………. म्हणजे जगदंबा.


रोज ………. म्हणून सारखी नावाने हाक मारतेस ,

मग उखाणा घेताना कशाला गं खोटे खोटे लाजतेस?


आज झाल आमच लग्न ,लग्नात आला होता बॅंडवाला,

……….च नाव घेतो झुकेगा नही साला.


इस्त्री केल्यावर कॉलर राहते एकदम ताठ ,

माझ्या ………. चे केस सिल्की,बाकी सगळ्यांचे राठ.


आंबे वनात कोकिला गाते गोड,

……….आहे माझी तळहाताचा फोड.


काळी कोंबडी चटया पटी ची ,

……….माझ्या एका रट्याची.


नाशिकची द्राक्षी,नागपूरची संत्री ,

……….झाली आज माझी गृहमंत्री.


तिला आणल मी फुलाच्या गाडीत ,

……….लय झकास दिसते हिरव्या साडीत.

05 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male

निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट,

……….रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.


चहा गरम रहावा म्हणून चहावर ठेवली बशी,

……….माझी गरीब गाय,बाकी सगळ्या म्हशी.


शिवरायांसाठी मावळ्यांनी सांडले होते रक्त,

……….चे नाव घेतो शिवरायांचा भक्त.


सीतेसारखं चरित्र लक्ष्मीसारखे रूप,

अगदी तशीच राणी मिळाली मला अनुरूप.


गाडीत गाडी डेक्कन क्वीन,

राणी माझी ब्युटी क्वीन.


रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे,

……….  चे रूप पाहून चंद्र सूर्य हसे .


निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे,

……….  चे नाव घेतो लक्ष द्या सारे.


खिशात माझ्या प्रेमाची लेखणी,

……….  माझी सगळ्या देखणी


गणपतीच्या दर्शनाला लागतात लांबच लांब रांगा,

……….  चे नाव घ्यायला कधीही सांगा .


यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी ,

……….  ला घेऊन जातो तिच्या सासरी .


माझ्या ……….  चा चेहरा आहे खूपच हसरा ,

टेन्शन प्रॉब्लेम सर्व क्षणामध्ये विसरा.


फुलात फुल जाईचे फुल,

……….  ने घातली मला भूल .


निर्मळ मंदिर, पवित्र मूर्ती,

माझं प्रेम फक्त ……….  वरती .


गरगर गोल फिरतो भवरा,

……….  च नाव घेतो मी तिचा नवरा.


चांदीच्या पैठणीला सोन्याचा काट,

……….  चे नाव घेतो पुढच नाही पाठ .


माझ्या गुणी ……….  ला पहा सगळ्यांनी निरखून,

जणू कोहिनूर हिरा आणलाय आम्ही पारखून.


जशी आकाशात चंद्राची कोर,

……….  सारखी पत्नी मिळायला नशीब लागते थोर.


01 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male Funny

सीतेसारखे चारित्र्य ,रंभेसारखे रूप,
…………. मला मिळाली अनुरूप.


वेरूळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,
…………. आहे माझी सर्वात सुंदर.


श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येतील नटून,
…………. माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.


रुक्मिणीने पण केला कृष्णाला वरीन,
…………. च्या साथीने आदर्श संसार करीन .


कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास,
…………. देतो मी …………. चा घास.


जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…………………….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.


पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे,
…………………….चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.


ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
…………………….चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.


अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
…………………….माझी सर्वांपेक्षा सुंदर.


एक होती चिऊ, एक होता काऊ,
…………………….चे नाव घेतो डोक नका खाऊ.


सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,
…………………….चे नाव घेतो…………………….च्या घरात.


चंद्रला पाहून भरती येते सागराला,
…………………….ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.


निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान,
…………………….चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.


पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय,
…………………….ला आवडते नेहमी दुधावरची साय.


संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी,
…………………….मुळे लागली मला संसाराची गोडी.


02 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male

रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे,
…………………….ला पाहून चंद्र-सुर्य हसे.


पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
…………………….चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.


हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात,
…………………….च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.


लग्नाच्या हळदीने माखल अंग,

……….चा आणखीनच गोरा झाला रंग.


वेळ झाली लग्नाची मंडपात जागा पुरणा,

……….चा मात्र मेकअप काही सरणा.


आहेच मुळात सुंदर पण आज दिसतेय खूपच गोड ,

……….च्या सौंदर्याला नाही कशाची तोड .


लग्नासाठी सुरूवातीला दिला नकार पण,

……….ला पाहिल्यावर नकाराचा झाला होकार.


गोडी गोडीनं आहे तिथच बसवलं

………. च्या वडिलांनी हुंड्यात फसवलं


पाहिलं जेव्हा ……….ला वेड लागलं मनाला ,

सासऱ्यांना म्हटलं हुंडा नको फक्त पोरगी द्या मला .


डोळे नक्षीदार नी केस आहेत कुरळे ,

………. च्या सौंदर्यावर भुलले मन माझे भोळे.


दिसते सुंदर राहते तोऱ्यात,

 ………. उठून दिसते इथल्या साऱ्यात


एक वाट एकच दिशा,

 मी आहे शब्द आणि ………. माझी भाषा.


साजूक तूप गोड भातावर ,

……….  च नाव गोंदल मी हातावर.


03 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male

उजळणीत सात नंतर येतो आठ,

……….   ची नी माझी आता एकच वाट .


काळ कव्हर पांढरे पेज ,

………. च्या चेहऱ्यावर हळदीचे तेज .


गोड लाडू तिखट भाजी,

……….  आता फक्त माझी .


जरीच्या साडीत शोभून दिसते भारी,

………. ला खुश ठेवणं ही माझी जिम्मेदारी.


हातात बांगड्या पायात पैंजण ,

………. काढते रांगोळी शोभून दिसते अंगण .


दुधापासून बनते दही,चक्का,तूप,
…………. आवडते मला खूप खूप.


नंदनवनात अमृताचे कलश,
…………. आहे माझी खूप सालस.


जुन्या पद्धतीच्या विवाहात ,शृंगाराची अनोखी कला,
…………. चा घास देतो माझ्या प्रिय …………. ला.


…………. माझे पिता …………. माझी माता,
शुभ मुहूर्तावर आणली …………. ही कांता.


चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
…………. ना घेऊन सोडतो कंकण.


इंद्राची इंद्रायणी, दुष्यंताची शकुंतला,
…………. नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.


देवळाला खरी शोभा कळसाने येते ,
…………. मुळे माझे गृहसौख्य खुलते.


निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
…………………….चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.


चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
…………………….चे नाव घेऊन सोडतो कंकण.


04 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male Long

जगाला सुवास देत उमलली कळी,
भाग्याने लाभली मला…………………….प्रेमपुतळी.


हत्तीच्या अंबारीला मखमली झुल,
माझी …………………….नाजुक जसे गुलाबाचे फुल.


सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल,
संसार करु सुखाचा …………………….तु, मी आणि एक मुल.


मातीच्या चुली घालतात घरोघर,
…………………….झालीस माझी आता चल बरोबर.


शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता,
…………………….राणी मिळाली स्वर्ग आला होता.


नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,
…………………….चे रुप आहे अत्यंत देखणे.


भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून,
…………………….चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.


बहरली फुलांनी निशीगंधाची पाती,
…………………….चे नाव घेतो लग्नाच्या राती.


ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
…………………….चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.


आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान,
…………………….चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान.


देवळाला खरी शोभा कळसाने येते,
…………………….मुळे माझे गृहसौख्य दुनावते.


सिल्कचा शालू मोरपंखी पदर ,

……….  चा नेहमी करेन मी आदर.


प्रेमात नसतात कोणत्या अटी नियम,

……….  नी माझी जोडी अशीच राहील कायम .


उन्हाळ्यात पडला प्रेमाचा पाऊस ,

……….  सोबत लग्नाची पूर्ण झाली हाऊस .


05 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male

पायात पैंजण केसात गजरा,

माझ्या ……….  वर खेळतात साऱ्यांच्या नजरा.


अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस,

……….  ला कामाचा आहे खूप आळस.


जेवणात केलाय बुंदीचा लाडू,

……….  ला सांगा नको रडू तर महिन्याला तुला माहेरी धाडू.


जेवणाच्या मरणात मीठ झालय जास्त ,

पण ……….  ने दोन वाट्या केल्या फस्त .


अंधार्‍या रात्रीत पसरलाय कालोख

……….  ची नी माझी पहिलीच ओळख .


तुळजापूरची तुळजा कोल्हापूरची महालक्ष्मी,

………. च नाव घेतो तीच माझी गृहलक्ष्मी.


सईबाईंचा पुत्र स्वराज्याचा छावा ,

………. चे नाव घेतो कायम तुमचा आशीर्वाद हवा.


ती आहे कारभारीन मी तिचा कारभारी,

………. चे नाव घेतो आमची जोडी लय भारी.


नवीन आयुष्याला आजपासून करतो मी सुरुवात ,

………. ला कायम सुखी ठेवेल वचन देतो लग्न मंडपात.


माझिया प्रियाला प्रित कळेना म्हणता म्हणता झाली ओळख आमची,

………. सोबत गाठ बांधली साता जन्माची.


आई वडिलांच्या आशीर्वादाने आयुष्य माझे फुलले ,

………. च्या हाती भविष्य आता सोपविले.


सगे सोयरे आप्तेष्ट मंगल प्रसंगी जमले,

………. चे नाव माझ्या मनावर कोरले .


06 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male Marriage

कळी हसेल, फूल उमलेल,मोहरून येईल सुगंध ,
…………. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.


काश्मिरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध,
…………. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.


निलवर्णी आकाशातून पडती पावसाच्या सरी,
…………. च नाव घेतो …………. च्या घरी.


जिजाऊसारखी माता,शिवाजीसारखा पुत्र,
…………. च्या गळ्यात बांधले मी मंगळसूत्र.


उगवला रवी ,मावळली रजनी,
…………. चे नाव सदैव वसे माझ्या मनी.


जाईजुईच्या फुलाचा दरवळतो सुगंध,
…………. सहवासात सापडतो आनंद .


मोहमया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
…………. बरोबर बांधली जीवनगाठ.


जगाला सुवास देत उमलते कळी,
…………. नाव घेतो …………. वेळी.


देवाला भक्त करतो मनोभावे वंदन ,
…………. मुळे झाले संसाराचे नंदनवन.


नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व,
…………. आहे माझे जीवन सर्वस्व.


भाजीत भाजी मेथीची ,
…………. माझ्या प्रीतीची.


विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात,
…………. अर्धांगिनी म्हणून घेतला हातात हात.


पाऊस नाही पाणी नाही,छपरी कशी गळती,
हाण नाही मार नाही …………. कशी रडती.


लग्नाचा वाढदिवस करु साजरा,
…………………….तुला आणला मोग-याचा गजरा.


कोरा कागज काळी शाई,
…………………….ला रोज देवळात जाण्याची घाई.


संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका,
…………………….चे नाव घेतो सर्व जण ऐका.


दारी होते कोनाडे त्यात होती पळी,
माझी …………………….व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.


आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड,
…………………….चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड.


07 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male

देवा जवळ करतो मी दत्ताची आरती,
…………………….माझ्या जीवनाची सारथी.


स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान,
…………………….चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान.


काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध,
…………………….सोबत जीवनात मला आहे आनंद.


अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा,
…………………….ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.


देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले,
…………………….शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.


श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण,
…………………….ला सुखात ठेवीन हा माझी पण.


नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड,
…………………….राणी माझा तळहाताचा फोड.


नंदनवनात अमृताचे कलश,
…………………….आहे माझी खुप सालस.


देवाला भक्त करतो मनोभारे वंदन,
…………………….मुळे झाले संसाराने नंदन.


दही चक्का तुप,
…………………….आवडते मला खुप.


हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी,
…………………….झाली आता माझी सहचारिणी.


आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल,
…………………….रावांच्या जीवनात…………………….राहील खुशाल.


आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन,
माझ्या नावाचे…………………….करी पुजन.


श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन,
…………………….च्या सोबत आदर्श संसार करीन.


चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा,
…………………….रावाच्या जीवावर …………………….मारते मौजा.


सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली,
…………………….राणी माझी घरकामाता गुंतली.


कोकणच्या सागर किनारी पोफळीच्या बागा ,

………. चा आता माझ्या मनावर ताबा .


07 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male

निळे पाणी ,निळे डोंगर ,हिरवे हिरवे रान,

……….चे नाव घेऊन रखतो सर्वांचा मान.


अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,

……….चे नाव घेण्यास शुभारंभ केला.


रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,

……….चे नाव घेतो असू द्या लक्षात.


वसंतात दरवळतो फुलांचा सुवास ,

सौ ……….सोबत सुरू केला जीवनाचा प्रवास.


हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली,

आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने……….माझी झाली.


वर्षाकाठचे महीने बारा,

………. या नावात सामावलाय आनंद सारा.


फुलासंगे मातीस सुवास लागे,

………. नि माझे जन्मोजन्मीचे धागे.            


गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ ,

सौ ……….  ने दिला मला प्रेमाचा हात.


चंद्र आहे चांदणीच्या संगती ,आणि

……….आहे माझी जीवन साथी .


चंद्राला पाहून भरती येथे सागराला,

………. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला .


जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने ,

………. च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.


जाईजुई चा वेल पसरला दाट,

 ………. बरोबर बांधली जीवनाची गाठ.

08 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male

जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध,

………. च्या सहवासात झालो मी धुंद .


दारी होते पातेले, त्यात होती पळी ,

……….  आहे माझी खूपच होळी.


कापला टोमॅटो, कापला कांदा ,

……….  ला पाहून झालाय माझा वांदा.


प्रेमाच्या रानात नाचतो मोर,

……….  शी केले लग्न नशीब माझं थोर.


जंगलात पसरला मोगऱ्याचा सुहास ,

……….  बरोबर करीन प्रेमाचा प्रवास.


फुलांच्या तोरणात आंब्याचे पान,

……….  ला पाहून झालो मी बेभान.


सूर्योदयाचे सुंदर आहे दृश्य ,

……….  आली जीवनात सुंदर झाले आयुष्य .


एक बाटली दोन ग्लास,

……….  आहे माझी फर्स्ट क्लास.


स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाने वाढवली शान,

……….  चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान॰


पिवळं सोन ,पांढरीशुभ्र चांदी,

……….  ने काढली माझ्या नावची मेहंदी.


विठोबा माझा विटेवरी उभा,

……….  ने वाढवली घरांची शोभा .


मंगळसूत्र घालून तुला कुंकू लावेल तुझ्या माती ,

कितीही संकटे आली तरी ……….  लाच करीन माझी जीवनसाथी .


गावरान अंडी तळली तुपात,

काहीतरी जादू आहे ……….  च्या रूपात .


09 250+ Best Latest Ukhane in Marathi for Male पुरुषांसाठी उखाणे

Latest Ukhane in Marathi for Male

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना ,

……….  चे नाव घेण्यास शब्द काही जुळेना.


दूर्वाची जोडी वाहतो गणपतीला,

……….  सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.


मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट ,

……….  चे बरोबर बांधली जीवनगाठ.


पंचपक्वनाच्या ताटात वाढले जिलेबी, पेढे,

……….  चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे .


अजिंठा वेरूळची शिल्पे आहे सुंदर ,

……….  माझी सर्वांपेक्षा सुंदर.


चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण ,

……….  चे नाव घेऊन सोडतो कंकण.


सगळ्या रूढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,

……….  सह घेतले मी सप्तपतीचे फेरे .


गणपतीच्या मंदिरात संगीताची गोडी,

सुखी ठेव गजानना ……….  आणि माझी ही जोडी


सवंगड्यांच्या साथीने स्वराज्याची सुरुवात झाली,

रायरेश्वरी शपथ घेऊन

……….  च्या साथीने संसाराची सुरुवात करतो,तुम्हा सर्वांचा मान राखून.


शहाजीराजांची दृष्टी, जिजाऊंची दिशा, शिवाजी राजांचे परिश्रम

आणि शंभूराजांच्या रक्षणातून स्वराज्य उभे राहिलं,

……….  सोबत नव्या आयुष्यात पाऊल टाकतो मी पहिलं


स्वराज्य उभारले शिवछत्रपतींनी सामान्य जनतेसाठी,

……….  चे नाव घेतो आज खास तुमच्यासाठी .


शिवबा जन्मले शिवनेरीवर ,स्वराज्य शपथ रायरेश्वरी ,

……….  च्या साथीने आशीर्वाद मागतो सुख-समृद्धी नांदो आमच्या घरी.


मावळ्यांची साथ आणि जिजाऊंचा आशीर्वाद, ऊर्जा स्त्रोत शिवबांचा,

……….  चे नाव घेत मागतो आशीर्वाद तुम्हा सर्वांचा .


रणरागिणी ताराराणी सून  छत्रपतींची,

……….  च्या साथीने झाली सुरुवात नव्या आयुष्याची .


महाराणी येसूबाई कुलमुखत्यार, संभाजीराजे छत्रपती,

……….  माझी श्री ,सखी ,जयती .


जिजाऊ,येसूबाई,ताराराणी नारी शक्ति स्वराज्याची,

……….  झाली लक्ष्मी माझ्या भाग्याची.


शिवछत्रपतींच्या राज्यात अवमान नाही कोणाचा,

……….  माझी राणी आदर करेल सर्वांचा आनंद.


आम्ही आशा करतो की आपणास पुरूषांसाठी उखाणे (Latest Ukhane in Marathi for Male) या POST मधून उपयोगी माहिती प्राप्त झाली असेल. पुरूषांसाठी उखाणे (Latest Ukhane in Marathi for Male) या POST विषयी आपण आपले मत आणि सूचना खाली दिलेल्या COMMENT BOX मध्ये द्वारे Ukhane Marathi  टीम पर्यंत पोहचवू शकता.

1 thought on “250+ Best Latest Ukhane in Marathi for Male | पुरुषांसाठी उखाणे”

Leave a Comment