250+ Best Haldi Kunku Ukhane in Marathi for Female | हळदी कुंकवाचे उखाणे

Haldi Kunku Ukhane in Marathi for Female :- हळदी कुंकवाचे उखाणे या post वरती क्लिक करून आपण Ukhane Marathi या सुप्रसिद्ध वेबसाइट वरती आल्याबद्धल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण नेहमी आपल्या आसपास पाहतो कि हळदी कुंकुवाच्या प्रसंगी स्त्रियांनी उखाणा घेण्याची पद्धत आपल्याकडे आहे. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत हळदी कुंकवाचे उखाणे (Haldi Kunku Ukhane in Marathi for Female). या पोस्टमध्ये आपल्याला विविध प्रकारचे उखाणे वाचायला मिळतील.

आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो कि, Haldi Kunku Ukhane in Marathi for Female ही पोस्ट वाचल्यानंतर आपण योग्य ठिकाणी उखाणा घेऊन आपल्या जिवलग व्यक्तीला Special Feel देऊ शकता.

हळदी कुंकवाचे उखाणे💘

कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ,

……….रावांच नाव घेते हळदी कुंकाची वेळ.


पौष महिन्याच्या रविवारी हळदी कुंकाने तुळस लाल केली,

………. रावांची जन्मपत्रिका सूर्यनारायणाने लिहिली.


शांतता आणि समता हेच नेहरूंचे धोरण,

………. चे नाव घेते हळदीकुंकू हेच कारण.


कान भरण्यात, बायका आहेत हौशी,

…………….. रावांच नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.


फुलांनी सजवले,हळदी कुंकवाचे ताट,

…………….. रावांमुळे मिळाली, माझ्या आयुष्याला वाट.


वडिलांची माया,आणि आईची कुशी,

…………….. रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी

01-250-Best-Haldi-Kunku-Ukhane-in-Marathi-for-Female-हळदी-कुंकवाचे-उखाणे

Haldi Kunku Ukhane in Marathi for Female👩‍❤️‍👨

नवीन वर्ष, सण पहिला संक्रांतीचा,मान हळदीकुंकवाचा आणि सुवासिणींचा,

……….चा जोडा राहो साताजन्माचा.


श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मेळी,

……….रावांच नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी.


हळदी कुंकला भेटतात,महिलांना गिफ्ट,

…………….. रावांनी दिली होती मला, लग्नाच्या आधी बाईकवर लिफ्ट.


गोकुळ झालं दंग, पाहून श्रीकृष्णाचे खेळ,

…………….. रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाची वेळ.


हळदी कुंकू आहे,सौभाग्याची शान,

…………….. रावांना आहे,सोसायटी मध्ये खूप मान.


१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला,

…………. रावांच नाव घेते हळदी कुंकवाला.


नाटकात नाटक गाजलं सुभद्राहरण,

…………. रावांच नाव घ्यायला हळदी कुंकवाच  कारण.

हळदी कुंकू उखाणे इन मराठी🥰

मंगलकार्याची खूण म्हणजे दाराला तोरण,

………. रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण.


कपाळाच कुंकू जसा चांदयाचा ठसा,

……….रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाला बसा.


गंगेचे क्षेत्र श्री विश्वेश्वर काशी, दिवशी.

………… रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.


 लपाछपीच्या खेळात चंद्राला चांदणी असते साक्षाला,

………… रावांच नाव घेते हळदी कुंकवाला.


 सत्यभामेने केली श्रीकृष्णाची तुला,

………… रावांच नाव घेते हळदी कुंकवाला.


मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला,

………… रावांच नाव घेते हळदी कुंकवाला.


 इंद्राची इंद्रायणी दुष्यतांची शकुंतला,

…………. रावांच नाव घेते हळदी कुंकवाला.


चांदीच्या तबकात हळदी-कुंकवाचा काला,

………….  रावांच नाव घेते हळदी कुंकवाला.

03-250-Best-Haldi-Kunku-Ukhane-in-Marathi-for-Female-हळदी-कुंकवाचे-उखाणे

Haldi Kunku उखाणे💛

संसाररूपी करंजीत प्रेम रूपी सारण,

………. रावांच नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण.


संक्रांतीच्या दिवशी ,तिळाचे काढते सत्व,

………. रावांचे नाव घेते ,आज हळदी कुंकवाचे महत्त्व.


मावळता सूर्य उगवतो शशी,

……….. रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.


सासू-सासरे प्रेमळ, दीर- जावा हौसी,

……….. रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी


नाटकात नाटक सुभद्राहरण,

……….. रावांच नाव घेते हळदी कुंकवाच कारण.


 शिवाजीसारखा पुत्र, धन्य जिजाऊची कुशी,

………..  रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.


 संसाररूपी सागरात पत्नीपेक्षा पती असावे हौशी,

……….. रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी

हळदी कुंकू चे उखाणे💘

तुळशीसमोर काढते सुंदर रांगोळी,

………. रावांच नाव घेते हळदीकुंकवाच्या वेळी.


हळदी कुंकूसाठी ,जमल्या सार्‍या बायका,

………. रावांचे नाव घेते सर्वांनी  ऐका.


शिवाजी महाराजांसारखा पुत्र धन्य जिजाऊंची कुशी,

……………….. रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.


एक निरंजन दोन वाती,

 ……………….. राव माझे पती आणि मी त्यांची सहभागी होती सौभाग्यवती.


मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी,

 ……………….. रावांचं नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी.


मंगलदिनी मंगल कार्याला आंब्याच्या पानाचे बांधता तोरण,

 ……………….. रावांचं नाव घ्यायला हळदी कुंकवाचे कारण.


स्वर्गीय नंदन वनात सोन्याच्या केळी,

……………….. रावांचं नाव घेते हळदीकुंकवाच्या वेळी.


बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी,

 ……………….. रावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या वेळी.

Haldi Kunku Ukhane Marathi Madhe💘

वडिलांची माया आणि आईची कुशी,

………. रावांचे नाव घेते ,हळदी कुंकूच्या दिवशी.


हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान,

……….रावांना आहे ,सोसायटी मध्ये खूप मान.


हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,

……… रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.


दशरथ राजाने पुत्रासाठी केले नवस,

………. रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी


चंद्राच्या उदयाने प्रफुल्लित होते कुमुदिनी,

………. रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिनी.


भ्रमराच्या गुंजरवे मुग्ध होते कमलिनी,

……….. रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिनी.


सोन्याच्या साखळीत शोभतो काळा मणी,

 ……….. रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिनी.


संसाराच्या अंगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी,

 ………… रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.

03-250-Best-Haldi-Kunku-Ukhane-in-Marathi-for-Female-हळदी-कुंकवाचे-उखाणे

Haldi Kunku Ukhane Long Marathi🥰

हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण,

……….रावांचे नाव घेते,हळदी कुंकाचे कारण.


भारत देश स्वतंत्र झाला,१५ ऑगस्टच्या दिवशी,

……….रावांचे नाव घेते,हळदी कुंकवाच्या दिवशी.


हिरव्या हिरव्या रानात करत होते हरण,

 ………………..  रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण


सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळे  मणी,

 ………………..   राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी


हृदयात असावे प्रेम, प्रेमात असावी निष्ठा,

निष्ठेत असावा विश्वास, विश्वासात असावा त्याग,

त्यागात असावी कृती, कृतीत असावी कला,

……………….. रावांच नाव घेते हळदी कुंकवाला


महादेवाला वाहतात बेल, कृष्णाला तुळशी,

…….रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.


कोल्हापुरच्या देवीपुढे हळदीकुंकवाच्या राशी,

…….. रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.


निलवर्णी आकाशात उगवला शशी,

……… रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.

Haldi Kunku Ukhane Simple💛

दशरथ राजाने पूत्रासाठी केला नवस,

……….रावांचे नाव घेते,आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.


हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल,

……….रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल.


हळदी कुंकू आहे आज म्हणून आजचा दिवस खास,

……………….. रावांचे नाव घेण्याची मला लागली आस


जास्वंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात,

………………..  रावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या सोहळ्याच्या


भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट च्या दिवशी,

………………..  रावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी


गुलाबाचे फुल दिसायला ताजे,

हळदी कुंकवा दिवशी, ……चे नाव घेते,सौभाग्य माझे.


दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस,

 ………………..   रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस

मराठी उखाणे हळदी कुंकू स्पेशल😎

फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट,

……….रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट.


गोकुळ झाले दंग पाहून श्रीकृष्णाचा खेळ,

……….रावांचे नाव घेते,आज आहे हळदी कुंकवाची वेळ.


हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल,

……………….. रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल


हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका,

 ………………..  रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका


हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी नेसली मी साडी छान,

  ………………..   रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान


वडिलांची माया आणि आईची कुशी,

………………..  रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी


आम्ही आशा करतो की आपणास मुंहळदी कुंकवाचे उखाणे (Haldi Kunku Ukhane in Marathi for Female) या POST मधून उपयोगी माहिती प्राप्त झाली असेल. आपण आपले मत आणि सूचना खाली दिलेल्या COMMENT BOX मध्ये द्वारे Ukhane Marathi  टीम पर्यंत पोहचवू शकता.

Leave a Comment